आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NDA परीक्षेत औरंगाबादचा डंका:अनुष्का बोर्डे देशात दुसरी अन् मुलींमध्ये पहिली; परीक्षेत मिळवले घवघवीत यश

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकडमी (NDA) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या झालेल्या परीक्षेमध्ये औरंगाबादची स्टेशनरी दुकानदाराची मुलगी देशात दुसरी आली आहे.

अनुष्काच्या या उत्तम कामगिरीचे संपूर्ण देशात कौतुक होत आहे. तसेच देशात दुसरी येऊन मुलींमध्ये पहिले येण्याचा मान तिने मिळवला आहे.

अनुष्काचा प्रेरणादायी प्रवास

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाघरुळ दाभाडी हे बोर्डे परिवाराचे मूळ गाव. हे कुटुंबीय 30 वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये राहायला आहे. अनुष्काचे वडील स्टेशनरी आणि झेरॉक्स दुकान चालवतात, तर आई गृहिणी आहेत. बोर्डे पती-पत्नींना स्वत:चं स्वप्न पूर्ण करणे शक्य झालं नाही. त्यामुळे मुलींनी शिकून मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा होती.

50 दिवसांमध्ये अभ्यास

अनुष्काला शाळेतील शिक्षकांकडून सैन्य दलाबद्दलची माहिती मिळाली होती. त्यांनी सैन्यात करिअर करण्यासाठी अनुष्काला प्रेरित केले. या विषयावरची पुस्तक वाचल्यानंतर सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा तिनं निर्धार केला. मुलींना पदवीनंतर सैन्यात प्रवेश मिळत असल्यानं तिनं सुरूवातीला इंजिनिअरिंग करण्याचं ठरवलं. पण, काही महिन्यांपूर्वी मुलींचा 12 वी नंतर सैन्यात प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

काय असते एनडीए परीक्षा ?

भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत भारतीय सशस्त्र सेना , संरक्षण उत्पादन विभाग आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था या तीन विभागांमध्ये एनडीए च्या माध्यमातून प्रवेश मिळवता येतो.

आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही संरक्षण दलामध्ये कार्य करणारे अधिकारी तयार करण्याचे काम राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडमी, एनडीए) पुणे करते. अशा प्रकारचे अधिकारी घडवणारी देशातील एकमेव अशी संस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे. बारावीनंतर एनडीएमध्ये प्रवेश मिळतो. यासाठी देशपातळीवर घेण्यात येणारी एनडीए प्रवेश परीक्षा द्यावी लागते. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC एनडीए प्रवेश परीक्षा घेत असते.

बातम्या आणखी आहेत...