आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराटे:10 व्या खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अनुश्री, सायली, साक्षी, रुद्रला सुवर्णपदक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस पेडम स्पोर्ट््स कॉम्प्लेक्स बॅडमिंटन हॉल मापसा (गोवा) येथे नुकत्याच पार पडलेल्या १० व्या खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत काता व कुमिते प्रकारात एकूण ४२ पदके आपल्या नावे केली. यात १६ सुवर्ण, १४ रौप्य व १२ कांस्यपदकांचा समावेश आहे.

हे सर्व पदक विजेते मिशन मार्शल आर्ट््स अॅड वुशू कुंग-फू स्पोर्ट््स कराटे असोसिएशन इंडियाचे खेळाडू आहेत. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक पवन घुगे आणि सचिव प्रवीण घुगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यशस्वी खेळाडूंचे राम बुधवंत, नंदा घुगे, श्याम बुधवंत, राधा घुगे, विश्वनाथ घुगे, राम चौरे, ओमकार वाघ, नीलेश पाटील आणि कोमल राठोड आदींनी अभिनंदन केले आहे.

विजेते खेळाडू : अनुश्री घुगे, सायली गोरे (सुवर्ण), प्रियांशी जांगिड (२ सुवर्ण), साक्षी काळवणे, शौर्या मोरे, अंकिता मेने (सुवर्ण, रौप्य), स्वरा कुलकर्णी, आर्या मुळे (सुवर्ण, कांस्य), तनुश्री घुगे, समीक्षा पुजारी (रौप्य), मनस्वी गावंडे, वेदिक तोरमड (रौप्य, कांस्य), एम. सेंथामराई (रौप्य), जियांशी ठाकर, कोमल पारवे (२ कांस्य). मुले - यशोधन घुगे, अद्वैत गावंडे (२ सुवर्ण), मल्हार कुलकर्णी, अभिनव तिडके (सुवर्ण, रौप्य), रुद्र चव्हाण (सुवर्ण, कांस्य), अभिजित देशमुख, श्रेयस मामिलवाड (रौप्य, कांस्य), जी. जाट (कांस्य, रौप्य), कुणाल लाड.

बातम्या आणखी आहेत...