आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:10 हजारांची लाच घेताना एपीआय अटकेत

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फसवणूक करणाऱ्या भूखंड मालकाकडून तक्रारदाराला पैसे परत मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागत त्यापैकी १० हजारांची लाच तक्रारदाराकडून घेणारे सहायक पोलिस निरीक्षक मदनसिंग रायासिंग घुनावत (४२) यांना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

तक्रारदाराने प्लॉटिंग व्यावसायिकाकडून एक प्लॉट खरेदी केला होता. त्यासाठी रोख १ लाख रुपये दिल्यानंतर उर्वरित रक्कम हप्त्याने देण्याचे ठरले होते. दरम्यान, या व्यावसायिकाने हा प्लॉट दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याचे निदर्शनास आल्याने तक्रारदाराने आपले २ लाख ५० हजार रुपये परत मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र, पैसे किंवा दुसरा प्लॉट देण्यास हा व्यावसायिक टाळाटाळ करत असल्याने तक्रारदाराने ठाण्यात धाव घेतली. मात्र, हे दिवाणी प्रकरण असल्याचे सांगत तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. पुढे एका वकिलामार्फत लेखी तक्रार अर्ज केल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेतली.

या तक्रारीवरून सहायक पोलिस निरीक्षक मदनसिंग घुनावत यांनी तक्रारदार व प्लॉटिंग व्यावसायिकास बोलावून त्यांच्यात समेट घडवून आणला होता. व्यावसायिकाने पैसे परत करण्यासाठी धनादेश देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर घुनावत यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. घुनावत यांनी ४ मार्च रोजी सायंकाळी आपल्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून १० हजारांची लाच स्वीकारली. तक्रारदाराने केबिनच्या बाहेर येऊन इशारा करताच पोलिस निरीक्षक रेश्मा सौदागर यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेत घुनावत यांना मुद्देमालासह पकडले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अतिरिक्त अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...