आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:महावितरणच्या ई-कामात गतिमानता आणा : कुलकर्णी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कर्मचारी हा कंपनीचा पाया आहे, त्यांचे प्रलंबित प्रश्न व अडीअडचणी सोडवण्यात हयगय करू नये, आधुनिक युगात पेपरविरहित कामे गतिमान व्हायला हवीत, असे आवाहन मानव संसाधन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी यांनी केले. त्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळातील मानव संसाधन विभागाच्या विशेष आढावा बैठकीनंतर हा सत्कार झाला. याप्रसंगी महावितरणचे औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार उपस्थित होते.

अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरण, कर्मचारी निलंबन प्रकरण, बिंदू नामावली नोंदणी प्रकरण, कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल प्रकरण, कर्मचारी सेवानिवृत्ती उपदान प्रकरण, वार्षिक वेतनवाढ प्रकरण, पदोन्नती पॅनल, विद्युत सहायक पदोन्नती प्रकरण, सेवानिवृत्ती वेतन प्रकरण, वैद्यकीय देयके प्रकरण, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी नामांकन इत्यादी प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित प्रकरणी अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीपर्यंत संवाद साधून व पाठपुरावा करून कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन मानव संसाधन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक कुलकर्णी यांनी केले. या प्रकरणांचा तत्काळ निपटारा करून महावितरण कंपनीची प्रतिमा सुधारावी, असे ते म्हणाले. औरंगाबाद परिमंडळाने कर्मचाऱ्यांचे रोस्टर १०० टक्के पूर्ण केल्याबद्दल सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा व त्यांच्या सहकाऱ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...