आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:जिल्हा परिषदेच्या पाठीवर आयुक्तांची कौतूकाची थाप, महा आवासमध्ये उत्कृष्ट काम केल्या बद्दल सत्कार

हिंगोली20 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हा परिषदेने मराठवाड्यात उत्कृष्ट काम केल्या बद्दल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी ता. 3 औरंगाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. राज्य शासनाने ता. 20 नोव्हेंबर ते ता. 5 जून या कालावधीत महाआवास अभियान राबविले. या अभियान काळात प्रत्येक जिल्हयांसाठी निकष ठरवून दिले होते. त्या निकषानुसार उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हयांची माहिती मागविण्यात आली होती.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मुल्यमापन करण्यात आले होते. त्यानुसार आज विभागस्तरीय पुरस्कार देण्यात आले आहे.औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते हिंगोली जिल्हा परिषदेला तिसरा पारितोषीक देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने प्रभारी प्रकल्प संचालक निलेश कानवडे, जिल्हा प्रोग्रामर गणेश पाटील यांची उपस्थिती होती.

हिंगोली जिल्हा परिषदेेने अभियान काळात 10,123 घरकुलांच्या मंजूरीच्या उदिष्टापैकी 9,484 घरकुलांना मंजुरी दिली आहे. तसेच 9,259 घरकुलांना पहिला हप्ता वितरीत केला. या शिवाय 7,387 घरकुलांचे काम पूर्ण केले आहे. या शिवाय 300 गवंडी यांना घरकुल बांधकामाचे प्रशिक्षण दिले. तसेच पाचही तालुक्यात डेमो हाऊस उभारले जात असून सध्या चार ठिकाणी या कामांना सुरवात झाली आहे. तसेच 17 भुमीहिनांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा परिषदेच्या या कामगिरीबद्दल विभागातून तिसरा पुरस्कार देण्यात आला आहे. जिल्ह्यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या.

बातम्या आणखी आहेत...