आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्री- मॅट्रीक शिष्यवृत्ती नोंदणीला सुरुवात:30 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज; शिक्षण विभागाने केले आवाहन

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्याक समाजातील इयत्ता 1 ली ते 10 वी वर्गातील गुणवत्ताधारक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रीक शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी अर्ज नोंदणी अणि अर्ज नूतणीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थीनींचे ऑनलाईन अर्ज 30 सप्टेंबरपर्यंत भरण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

2 वेळेस अर्ज भरल्यास होणार बाद

शाहास्तरावरती नवीन व नूतनीकरण अर्जाच्या पडताळणी करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2022 आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज भरता येईल. तसेच एका विद्यार्थ्याने नवीन नूतरणीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरवले जातील. विद्यार्थ्यांचे बँकखाते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे, नसल्यास पालकांचे राष्ट्रीयकृत बँकखात्याची माहिती अर्जात भरता येईल. ही सर्व माहिती संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी ही संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहिल असे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

असा करा अर्ज

अधिक माहितीसाठी www.scholarships.gov.in तसेच अर्ज भरण्यासाठी www.minorityaffairs.gov.in संकेतस्थळ देण्यात आले आहे. तर अर्ज भरण्यासाठी शासनमान्यता प्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे. अर्जदार विद्यार्थी 50 टक्के पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण असावा, एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही, या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा, एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थीनींसाठी राखीव आहे.

हे द्या कागदपत्र

तसेच वसतीगृहामध्ये भरलेल्या शुल्काच्या पावत्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सादर करणे बंधनकारक आहे. तसेच अर्ज भरताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, बँक व आधार माहिती अचूक भरावी, धर्माबाबतचे स्वयंघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्र, आधारकार्ड विद्यार्थ्यांचा फोटो पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आदी कागदपत्रे मुख्याध्यापकांनी सादर करावेत असेही पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...