आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:31 ऑगस्टपर्यंत करता येईल इग्नुत प्रवेशासाठी अर्ज

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या वतीने ३१ जुलै पर्यंत प्रवेश अर्ज नोंदणीची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढविण्यात आली असून, इच्छुकांना आता ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. अशी माहिती औरंगाबाद शहरातील विवेकांनद महाविद्यालयात असलेल्या इग्नु सेंटरच्या वतीने देण्यात आली आहे.

या प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहिती देतांना प्राचार्य श्याम शिरसाट यांनी सांगितले की, इग्नू प्रवेशांमध्ये पदवी स्तरावर वेगवेगळ्या कोर्सेस मध्ये बीसीए, बीए , बी कॉम , बी एस डब्ल्यू , मास्टर्स डिग्री प्रोग्राम्स मध्ये म्हणजेच पदव्युत्तर स्तरावर /कोर्सेस मध्ये एम. ए. इंग्लिश, हिंदी, एम एस डब्ल्यू, मानसशास्त्र, इतिहास ,अर्थशास्त्र, हिंदी, राज्यशास्त्र, लोकप्रशासन , समाजशास्त्र, कॉमर्स, रूरल डेव्हलपमेंट तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम्स मध्ये ट्रान्सलेशन, गांधी आणि पीस स्टडीज, रूरल डेव्हलपमेंट, जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन, उच्चशिक्षण, डिझास्टर मॅनेजमेंट, बुक पब्लिशिंग, टुरिझम , क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश अशा वेगवेगळ्या कोर्सेसना ३१ पर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...