आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारखा जाहीर:‘नेट’ परीक्षेसाठी 17 जानेवारीपर्यंत करा अर्ज

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे सहायक प्राध्यापक होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नेट परीक्षा जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. डिसेंबर २०२२ मध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलली होती. आता ही परीक्षा २१ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी यूजीसीच्या संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांना १७ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. २०२३ या वर्षातील पहिली परीक्षा १३ ते २२ जून या कालावधीत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...