आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण हक्क:आरटीईचे प्रवेश 21 जूनपर्यंत करा ; सक्तीचा शिक्षण हक्क कायदा करण्यात आला

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरटीईच्या दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवेश सुरू आहेत. ते २१ जूनपर्यंत पूर्ण करून त्याचा अहवाल शिक्षण विभागास सादर करावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर पाटील यांनी दिल्या आहेत.

आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा करण्यात आला. या अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा ही प्रक्रिया जानेवारीमध्ये सुरू करण्यात आली. आतापर्यंत प्रवेशाची नियमित लकी ड्रॉनंतरची फेरी आणि त्यानंतर प्रतीक्षा यादीतील प्रवेश पूर्ण झाले आहेत.

दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवेश १० जूनपासून सुरू झाले आहेत. यात ४४३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. हे प्रवेश २१ जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावेत, अशा सूचना सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना प्राथमिक शिक्षण संचालक विभागाकडून देण्यात आल्या आहेत. औरंगाबादमधून यंदा या प्रवेशासाठी ५७५ शाळा पात्र ठरल्या आहेत. त्यासाठी एकूण ४ हजार ३०१ प्रवेश क्षमता आहे. यासाठी एकूण १७ हजार २२१ अर्ज आले आहेत. त्यापैकी प्रवेशासाठी आतापर्यंतच्या सर्व फेऱ्या मिळून ४ हजार १९३ जणांनी निवड झाली तरीही प्रवेश मात्र २ हजार ७०८ जणांनीच निश्चित केल्याची माहिती पोर्टलवर दिली आहे. नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात १५ जूनपासून झाली आहे. त्यामुळे आता २१ जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...