आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा विभाग:परीक्षेपूर्वीच नियुक्तिपत्रे, क्रीडा विभागात 35 पदांवर बाेगस भरती, 4 कोटींचा गैरव्यवहार

औरंगाबाद / एकनाथ पाठक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परीक्षा, मुलाखती आदींचे सोपस्कार केवळ कागदोपत्री दाखवून राज्याच्या क्रीडा विभागात ३५ पेक्षा अधिक बोगस पदभरती करण्यात आल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक कल्याण संचालनालयाशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये ही बाेगस पदभरती झाली. सन २०१५ ते २०१७ या कालावधीत वित्त विभागाची मान्यता नसताना वर्ग-३ आणि ४ च्या पदासाठी भरती करण्यात आली. विशेष म्हणजे पदभरती करणाऱ्या क्रीडा उपसंचालकानेच अतिरिक्त पदे असल्याचे सांगून सन २०१७ च्या भरतीमधील १० जणांची हकालपट्टी केली आहे. या बोगस पदभरतीमध्ये सुमारे ४ काेटी २० लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे सांगितले जाते.

उपलब्ध पद एक; जाहिरात दाेन पदांची; प्रत्यक्षात भरली पाच पदे
शासन निर्णय २०१५ नुसार रिक्त दाेन पदांच्या ५० टक्क्यांप्रमाणे एक पद येते. या पदभरतीकरिता दाेन पदांची जाहिरात काढण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात परीक्षा न घेताच या पदावर पाच जणांना नियुक्त करण्यात आले. ही पदभरती ७ आॅगस्ट २०१७ राेजी करण्यात आली. या पदावर एस.व्ही. जाधव, जी. बीचकर, गीतांजली आटाेळे, आर.जाधव, प्रतीक शिंदे यांचा समावेश आहे.

दोषींवर कारवाई होईल
क्रीडा विभागामध्ये तीन वेळा बाेगस पदभरती करण्यात आली. नियम डावलून ही पदभरती झालेली आहे. हे आता लक्षात आले. त्यामुळे आम्ही याचा अहवाल शासनाकडे पाठवला. याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत. यातून दाेषींवर निश्चितपणे कडक कारवाई हाेईल. - आेमप्रकाश बकाेरिया, क्रीडा आयुक्त

बातम्या आणखी आहेत...