आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इम्पॅक्ट:अहवाल सांगण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांची माहिती

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमधील बजाजनगर आरोग्य उपकेंद्रामधून पॉझिटिव्ह-निगेटिव्ह अहवालाची चुकीची माहिती दिली गेल्यानंतर पुन्हा अशी चूक होऊ नये यासाठी पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अहवालाची माहिती देण्यासाठी दोन स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले.

बजाजनगर येथील आरोग्य उपकेंद्रातून निगेटिव्ह तरुणाला पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह आई-वडिलांना निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले होते. यासंबंधी व्हिडिओ व्हायरल  झाल्यामुळे खळबळ उडाली  होती. दरम्यान, आरोग्य विभागामार्फत सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. परंतु असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी दोन स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे डॉ. गोंदावले यांनी सांगितले. तसेच अहवाल सांगताना विशेष काळजी घेण्याचे आदेश ही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे डॉ गोंदावले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...