आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 डिसेंबरपर्यंत सिंचन विहीर मंजूर करा:विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांचे आदेश

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार नोव्हेंबरला रोहयोत काढलेल्या अध्यादेशानुसार वैयक्तीक सिंचन विहीरीला चार लाख रुपयांची मदत मिळेल. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत या प्रस्तावांना मंजूरी द्या, असे आदेश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मंगळवारी मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.

औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, नांदेडच्या वर्षा ठाकुर, जालना वर्षा मिना, परभणी रश्मी खांडेकर, बीडचे अजित पवार, लातूर अभिनव गोयल आदी उपस्थित होते. मराठवाड्यात ९३११ किमी पाणंद रस्ते कामासाठी सर्व प्रकारच्या मान्यता १५ डिसेंबरपर्यत पूर्ण करा. त्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये, असेही केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना बजावले.

बातम्या आणखी आहेत...