आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुम्ही नेहमीच कार्यालयीन सहकाऱ्यांच्या तोंडून ‘चल, चहा किंवा काॅफी मारूयात’ असे ऐकले असेलच. किंवा एखादा ग्राहक किंवा पाहुणा आल्यास तुम्ही त्यांना पेय ऑफर करताना ‘तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी ?’ अशी विचारणा करता. पाहुणाही त्वरित उत्तर देताे की, ‘तुम्ही घेणार असाल तर थोडी कॉफी चालेल!’ तेव्हा तुम्ही ऑफिस बॉयला बोलावून दोन कप कॉफी आणण्यास सांगता. शहरातील कोणत्याही व्यग्र मध्यवर्ती व्यावसायिक कार्यालयातील हे दैनंदिन चित्र आहे. त्या भागातील सर्वात व्यग्र मनुष्य चहावालाच असतो. त्याची चूल आठवड्यातील सहा दिवस सलग १६ तास पेटलेली असते. आधुनिक चहावाल्यांनी स्वत:ला कपुचिनो किंवा एक्सप्रेसोसारख्या वस्तू लावून अपडेट करून घेतले. कारण कटिंग चहाच्या तुलनेत यात जास्त नफा असतो. कार्यालयीन वेळेत ते या जास्त नफा देणाऱ्या महागड्या पदार्थांना अधिक प्रोत्साहन देतात. तुम्ही आजूबाजूला बघितले तर स्टारबक्स ते सीसीडीपर्यंत अनेक दुकाने दिसतील. कॉफी बीन्स ग्राइंडिंग मशीनचा सुगंध तुम्हाला कळत-नकळत चहाऐवजी कॉफीची निवड करण्यास प्रेरित करतो. परंतु तुम्ही माझ्यासारखेच कामाच्या ठिकाणी अनेक कप कॉफी पिणारे, कॅफिनचे अधिक सेवन करणारे असाल तर ही माहिती तुमच्या रविवारच्या वाचनासाठी आहे.
मी रोज सहा ते सात कप कॉफी पीत आलो आहे. मला कधी झोपेचा त्रास झाला नव्हता, परंतु अलीकडेच मला हा त्रास होऊ लागला. विशेषत: कोरोनानंतर माझे कॉफी पिणे वाढले आणि मी या चहावाल्यांच्या माॅडर्न सेल्स गिमिक्सचे सावज ठरलो. मी नेहमीपेक्षा जास्त कॉफी पीत असल्याचे लक्षात आल्यानंतर मी त्यात कपात सुरू केली, ज्यामुळे माझ्यात विड्रॉल सिम्प्टम्स दिसू लागले. जसे की डोकेदुखी, डगमगणे आणि चिडचिड होणे. तेव्हा मी कॉफी बीनच्या इतिहासाचा खोलवर अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की, हल्ली बहुतांश कॉफी शॉप अरॅबिका बीनऐवजी अशा रोबस्टा बीनचा वापर करतात, ज्यात दुप्पट प्रमाणात कॅफिन असते. काही विक्रेते ती एक्स्ट्रा स्ट्राँग कॉफी सांगून विकतात. यालाच आपण कॉफीचा गडद रंग या अर्थाने बघतो. मात्र जितके जास्त कॅफिन असेल तितका कॉफीचा स्वाद स्ट्राँग असेल.
तुम्ही विचार करत असाल की रोज किती प्रमाणात कॉफी पिणे सुरक्षित आहे? एका युरोपियन फूड सेफ्टी संस्थेनुसार ४०० मिलिग्रॅम कॅफिन घरी बनवलेल्या चार कॉफीच्या बरोबरीने आहे. मात्र स्टारबक्स कॉफीच्या प्रत्येक कपात ६६ मिलिग्रॅम कॅफिन असते. ही वगळता उर्वरित सर्व उच्च श्रेणीच्या कंपन्यांच्या कॉफीच्या प्रत्येक कपात ३ आकडे व त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात कॅफिन असते. काही ठिकाणी तर ३२५ मिलिग्रॅमपर्यंत कॅफिन आढळते. शेवटी निष्कर्ष काढला की माझ्या निद्रानाशाचा दृढ संबंध माझ्या वाढत्या वयाशीही आहे आणि त्यासाठी कॉफी पिणे सोडणे हा उपाय नसेल. सध्या मी निवडक बीन्सपासून बनवलेल्या कॉफीचे मर्यादित स्वरूपात सेवन करतोय. मला गाढ झोपही लागते. परंतु पण समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी मला ३ महिने लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.