आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत गाडगेबाबा महाराजांनी ६० वर्षांपूर्वी शिक्षणावर प्रबोधन केले. मायबाप हो..शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असा संदेश दिला. थोर पुरुषांचे विचार आत्मसात करा असे प्रतिपादन खंजिरीवादक संदिपाल महाराज यांनी केले.संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी सिडको एन-९ श्रीकृष्णनगर येथील गाडगेबाबा मठ येथे संत गाडगेबाबा सेवा संस्थेतर्फे स्वच्छता अभियान, संदिपाल महाराजांचे कीर्तन झाले. सकाळी एम-२ भागातील फरशी मैदानावर ३० ते ३५ नागरिकांनी हातात खराटे, झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवले. मान्यवरांच्या उपस्थितीत गाडगे महाराज यांना अभिवादन केले.
यानंतर २ हजार नागरिकांसाठी दीड क्विंटलची दाळबट्टी, ३० किलो शिऱ्याचा प्रसाद केला. यासाठी अध्यक्ष कचरू घोडके, बी.डी. सूर्यवंशी, उमेश शिंदे, अनिल शिंदे, कृष्णा शिंदे यांनी सहकार्य केले.तरुणांनो, व्यसनाधीतेपासून दूर राहा - रमेश महाराज : या वेळी संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत रमेश महाराज यांनी प्रबोधन केले. ते म्हणाले की, गाडगेबाबा यांचे साधे राहणीमान होते. त्यांनी गोरगरिबांची सेवा केली, लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, गोरगरिबांना शिक्षण, रुग्णांना औषधी, प्राण्यांना अभय अशा विविध दहासूत्री कार्यक्रम अमलात आणला. त्यांनी देव हा दगडात नसून माणसात असल्याचे समजून विविध ठिकाणी धर्मशाळा सुरू केल्या. त्यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा. रक्तदान शिबिरात या वेळी अध्यक्ष कैलास निकम, जर्नादन घोडके आदींची उपस्थिती होती.
सिडको बसस्टँड, कॅनॉट प्लेस येथे स्वच्छता अभियान उपक्रम बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंच व समविचारी संस्था -संघटनांतर्फे सिडको बसस्टँड, कॅनॉट प्लेस येथील परिसरातही स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी दत्तात्रय ढेरे या व्यक्तीने व्यसनमुक्तीची शपथ घेतली. या वेळी स.सो. खंडाळकर, टी.एस. चव्हाण, पुंडलिक धनगर, शाहीर वीर गुरुजी, निर्मला बडवे, एकनाथ त्रिभुवन, सरिता हरकळ आदींची उपस्थिती होती.
विजयनगरात रक्तदान शिबिर विजयनगर येथील संत गाडगेबाबा उद्यानात रक्तदान शिबिर, कीर्तनाचे आयोजन केले होते. यात १५ जणांनी रक्तदान केेले. या वेळी एस.बी. नन्नावरे यांनी इंडो-जर्मनच्या विद्यार्थ्यांना रोजगाराविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक समता संघातर्फे सूतगिरणी चौकात व्यसनमुक्तीसह स्वच्छता अभियान राबवले. या वेळी दहा जणांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. या वेळी अप्पासाहेब ठोंबरे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.