आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातब्बल दोन वर्षांपासून महापालिका निवडणुकीची वाट पाहणारे १७ लाख औरंगाबादकर, राजकीय पक्षांचे प्रतिनिधींची व इच्छुक उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली. महापालिकेने अखेर १२६ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी ४२ प्रभागांच्या सीमा निश्चितीचा आराखडा गुरुवारी जाहीर केला. मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनी या सीमा निश्चितीवर आक्षेप नोंदवून त्याला विरोध दर्शवला आहे. अधिकृत आराखडा जाहीर झाल्यानंतरही अनेक कॉलनी, वसाहतीतील मतदारांना आपला समावेश नेमक्या कोणत्या प्रभागात झाला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे ते गोंधळात आहेत. दरम्यान, मनपाने १६ जूनपर्यंत लेखी आक्षेप सादर करण्याची मुभा दिली आहे. त्या हरकतींची माहिती १७ जून रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल. २४ जूनपर्यंत त्यावर आयोगातर्फे नियुक्त अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होईल. त्यांच्या शिफारशी, सूचनांसह ३० जूनपर्यंत अंतिम आराखडा आयोगाकडे सादर केला जाईल, अशी माहिती मनपा उपायुक्त डॉ. संतोष डेंगळे यांनी दिली. सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आराखड्याला विरोध.
एकूण नगरसेवक : १२६ (प्रत्येक प्रभागात ३), अनु. जाती नगरसेवक : २४ (महिलांसाठी १२) अनु. जमाती नगरसेवक : ०२ (महिलांसाठी १) सर्वसाधारण नगरसेवक : १०० (महिलांसाठी ५०)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.