आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:पोलिसांशी अरेरावीची भाषा; पिता-पुत्राला कोठडी, शनिवारी रात्री पावणेनऊ वाजता उस्मानपुऱ्यातील साठे चौकात हा प्रकार घडला

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी अरेरावी करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी रात्री पावणेनऊ वाजता उस्मानपुऱ्यातील साठे चौकात घडला. हा प्रकार पोलिस उपायुक्त दीपक गिर्हे यांच्यासमोर घडला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून अरेरावी करणाऱ्या पिता-पुत्राला अटक केली. गुरुबचन खैरुराम सिरसवाल (५१), दौलत गुरुबचन सिरसवाल (३०, दोघे रा. छोटा मुरलीधरनगर, उस्मानपुरा) अशी अटक पिता-पुत्राची नावे आहेत. या प्रकरणात उस्मानपुरा ठाण्याचे अंमलदार चंद्रकांत कचरू चंदेल (३५) यांनी फिर्याद दिली. कारचालकाला मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात उस्मानपुरा ठाण्‍याचे पोलिस व झोन दोनचे उपायुक्त दीपक गिर्हे आरोपी करमवीर चौहानला घेऊन पंचनामा करण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपी गुरुबचन सिरसवाल तेथे आला व कारचालकाला मारहाणप्ररकणी तुम्ही करमवीरला का अटक केली आहे, त्याला सोडून द्या, असे म्हणत उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक बागवडे यांच्याशी वाद घालू लागला. त्यानंतर माझे वडील जसे म्हणतात तसे करा, अन्यथा लोकांना जमा करू, असे म्हणत फिर्यादीशी धक्काबुक्की करून झटापट केली. पोलिसांनी आरोपी पिता-पुत्राला न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...