आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:बजेट पुस्तिकेवरून लेखा विभागात अधिकाऱ्यांत वाद

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या लेखा विभागात अधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध हा कायम चर्चेचा विषय असतो. बुधवारी, ५ एप्रिल रोजी याची पुन्हा एकदा प्रचिती आली. मनपाचा अर्थसंकल्प सादर होऊन पाच दिवस उलटले तरी बजेटबुक तयार झालेले नाही. बजेटबुक मिळाले नसल्यामुळे लेखाधिकाऱ्यांनी लेखा विभागातील मुख्य लेखाधिकारी यांच्या दालनात जाऊन त्यांच्याकडे बजेट पुस्तिकेची मागणी केली. त्यावरून मुख्य लेखाधिकारी व लेखाधिकारी यांच्यात शाब्दिक वादावादी झाली.

महापालिकेचा अर्थसंकल्प ३१ मार्च रोजी सादर झाल्यानंतर त्याच्या प्रती प्रत्येक विभागाला द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी बजेट छपाईसाठी देण्यात आले आहे. बुधवारी दुपारी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे हे दालनात बसले असताना लेखाधिकारी संजय पवार तेथे आले. पवार यांनी बजेट पुस्तिका मिळाली नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. वाहुळे यांनी पवार यांना ‘बजेटबुक छपाईसाठी पाठवण्यात आले आहे,’ असे सांगितल्यानंतर पवार दालनातून बाहेर पडले. यासंदर्भात मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे म्हणाले की, लेखाधिकारी संजय पवार हे माझ्या दालनात आले होते. त्यांनी बजेटबुक मिळाले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. इतर विषयावरही त्यांच्यासोबत वादावादी झाली. मात्र, सर्व परिस्थितीची माहिती दिल्यानंतर ते दालनातून बाहेर पडले.’