आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक प्रकार:मैत्रिणीसोबत रीलवरून वाद; व्हिडिओ दाखवायला गेलेल्या तरुणाचा मुलीच्या आईवर हल्ला

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावरील रीलवरून मैत्रिणीसोबत झालेल्या वादातून दोन तरुणांनी थेट तिचे घर गाठत व्हिडिओ दाखवताना मैत्रिणीच्या आईच्याच गळ्यावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना मिटमिटा परिसरात घडली. याप्रकरणी छावणी पोलिसांनी पालाश ऊर्फ अविनाश पाटील (१९, रा. तारांगण सोसायटी) याला अटक केली, तर त्याचा साथीदार अल्पवयीन असल्याने नोटीस देऊन पालकांच्या ताब्यात दिले. ही घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली.

११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता पालाश व त्याचा अल्पवयीन मित्र त्यांच्या घरी गेले. आमच्याकडे तुमच्या मुलीचे काही व्हिडिओ आहेत, तुम्हाला दाखवतो, असे म्हणाले. सुरुवातीला जखमी महिलेने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्हिडिओ न दाखवता तुमच्या मुलाला पाठवतो, असे म्हणून वाद घालू लागले. कशाचे व्हिडिओ आहेत, असे म्हणत जखमी महिलेने मोबाइल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोन्ही मुलांनी महिलेचे तोंड दाबले व दुसऱ्याने थेट ब्लेडने गळ्यावर वार केले. यात महिला गंभीर जखमी झाली. घटनेनंतर दोघेही पळून गेले. घटनेची माहिती कळताच उपनिरीक्षक पांडुरंग डाके यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तांत्रिक तपासावरून दोघेही आधी वाळूजच्या दिशेने पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर ते दोघेही एएस क्लब परिसरात आढळले. त्यात पालाशला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे डाके यांनी सांगितले. जखमी महिलेची मुलगी व अल्पवयीन आरोपी एकमेकांच्या आेळखीचे आहेत. दोघेही अकरावीत शिक्षण घेतात, तर पालाश प्रथम वर्षाचे शिक्षण घेताे. सोशल मीडियावरील रीलवरून त्यांच्यात वाद झाल्याचे प्राथमिक कारण पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...