आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात बसण्यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे:विमानात आर्म-रेस्ट मध्यभागीच्या प्रवाशासाठी, पण विंगजवळील आसन सर्वात जास्त स्थिर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विमान प्रवासात लाेकांना अनेक प्रकारच्या त्रासाला ताेंड द्यावे लागते. आसन, आराेग्य किंवा इतर अनेक प्रकारचे त्रास असू शकतात. या प्रश्नांची निश्चित अशी उत्तरेही मिळत नाहीत. परंतु २० वर्षांपासून फ्लाइट अटेंडंट असलेल्या क्रिस्टी काेअरबेल यांनी याबद्दल माहिती दिली. विमानात झाेपल्यामुळे जेट लेगचा परिणाम कमी हाेताे? त्याबद्दल क्रिस्टी म्हणाल्या, हाेय. त्यामुळे नक्कीच फायदा हाेताे. विमानात तुम्हाला झाेप येत असल्यास खुशाल झाेप काढा. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात तुमच्या ऊर्जेची बचत हाेते. प्रवास कमी अंतराचा असल्यास तुम्ही डुलकी काढू शकता. जेट लेगचा परिणाम त्यामुळे कमी हाेईल. फ्लाइटमध्ये मध्यभागी बसणाऱ्या व्यक्तीने आपला हात काेणत्या आर्म-रेस्टवर ठेवला पाहिजे? यावर क्रिस्टी म्हणाल्या, मध्यभागाचे आसन हे अवघड ठिकाण आहे. अलिखित नियमानुसार अशा अासनाच्या आजूबाजूच्या प्रवाशांसाठी हे आर्म-रेस्ट असतात. त्याशिवाय शेवटी स्वतंत्र आर्म-रेस्ट असतात. क्रिस्टी म्हणाल्या, विमानात चक्कर येणे सामान्य बाब आहे.

विषबाधा हाेऊ नये म्हणून अटेंडंट एकवर्णी खात नाहीत क्रिस्टी म्हणाल्या, फ्लाइट अटेंडंटना काही सूचना केलेल्या असतात. काेणत्याही घरातून आणलेले पदार्थ खाऊ नयेत. कारण त्यात काय असेल, याची तुम्हाला कल्पना नसते. त्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दिले जातात. त्यामुळे एकाच प्रकारचा पदार्थ खाऊन विषबाधा हाेत असल्यास संपूर्ण विमान कर्मचारी वर्ग आजारी पडू नये, असा त्यामागील उद्देश असताे.

बातम्या आणखी आहेत...