आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळ स्पर्धा:अर्पिता, प्रतीक्षा, याधवी ठरल्या सर्वात वेगवान धावपटू; चंद्रा मीडिया संघ ठरला एमपीएल चॅम्पियन

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला दिनानिमित्त विविध सरकारी कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेत राज्य जीएसटी कार्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले. एमआयटी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात राज्य संघाने सिडको कार्यालयाच्या सिडको सुपर क्वीन्स संघाला १५ धावांनी पराभूत केले. सुपर क्वीन्स उपविजेता ठरला. स्पर्धेत एकूण चार संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघांना जीएसटी आयुक्त जी. श्रीकांत व सिडको मुख्य प्रशासक दीपा मुधोळ यांच्या हस्ते चषक देण्यात आला. याप्रसंगी उपायुक्त रवींद्र जोगदंड, धनंजय देशमुख, सिडको प्रशासक भुजंग गायकवाड आदींची उपस्थिती होती.

चंद्रा मीडिया संघ ठरला एमपीएल चॅम्पियन

एडीसीए मैदानावर आयोजित एएसआर मसिआ प्रीमियर लीग स्पर्धेत चंद्रा मीडिया इलेव्हन संघ चॅम्पियन ठरला. अंतिम लढतीत चंद्राने किर्दक चार्जर्स संघावर १५ धावांनी विजय मिळवला. स्पर्धेत प्रदीप चव्हाण व गजानन भानुसे मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज अमोल म्हस्के, उत्कृष्ट गोलंदाज विजय अहिरे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संदीप भंडारी आणि मंगेश निटूरकरला उत्कृष्ट अष्टपैलूचा पुरस्कार देण्यात आला. प्रथम खेळताना चंद्रा संघाने ९ बाद १४९ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात किर्दक संघ १९.३ षटकांत १३४ धावा करू शकला. विजेत्या संघाला पोलिस अधीक्षक निमित गोयल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एएसआरचे श्रीधर नवघरे, एमएसईबीचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, मसिआ अध्यक्ष नारायण पवार, क्रीडा समिती प्रमुख मंगेश निटूरकर यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...