आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती:विद्यार्थिनीसाठी केंद्रावर बेडची व्यवस्था; आठवी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत 95.02 टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) इयत्ता आठवीसाठी रविवारी शहरातील १४ केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेत पहिल्या पेपरसाठी ९५.०२ टक्के, तर दुसऱ्या पेपरसाठी ९४.९७ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. औरंगपुरा परिसरातील परीक्षा केंद्र असलेल्या शारदा मंदिर कन्या प्रशाळेत अंधारी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी साक्षी संतोष उबाळे या विद्यार्थिनीचा अपघातात पाय दुखावला गेला होता. या विद्यार्थिनीसाठी केंद्रावर बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका सविता मुळे यांनी दिली. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना आहेत.

त्यानुसार सूचनांचे पालन करत आणि विद्यार्थिनीची स्थिती पाहून तिच्यासाठी बेडची व्यवस्था केल्याचे उपमुख्याध्यापिका वंदना रसाळ यांनी सांगितले. औरंगाबाद शहरातील १४ केंद्रांवरील १८३ ब्लॉकमध्ये ही परीक्षा झाली. परीक्षेसाठी जिल्ह्याची एकूण क्षमता ४ हजार ३९२ इतकी होती. मात्र, यंदा एकूण ४ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यात मराठी माध्यम ४०७३, उर्दू माध्यमाचे ८७, इंग्रजी १११, तर हिंदी माध्यमाचे २ विद्यार्थी प्रविष्ट होते. सकाळच्या सत्रात मानसिक क्षमता चाचणी पेपर घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...