आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोर:सात दिवसांपूर्वी चोरलेली दुचाकी विकणारा अटकेत ; शेख अमजद शेख गफूर याला पोलिसांनी अटक

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूरमधून ७ दिवसांपूर्वी चोरलेली दुचाकी विक्रीसाठी कंबरेला धारधार चाकू लावून आलेला अट्टल गुन्हेगार सिराज शेख सईद (२०) यास सिटी चौक पोलिसांनी तत्काळ अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या दुचाकीसह चाकू जप्त केला. पडेगावातील सिराज वारंवार गुन्हे करतो. लूटमार, दुचाकी चोरी, मारहाणीसारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने सात दिवसांपूर्वी वैजापुरातून दुचाकी चोरून बारुदगर नाला येथे आला. ही माहिती उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांना कळताच निरीक्षक अशोक गिरी यांच्या सूचनेवरून मुनीर पठाण, विलास काळे, शाहेद पटेल, देशराज मोरे, सोहेल पठाण तेथे गेले. मात्र, त्यांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करताच पाठलाग करून पकडले.

मोबाइल चोराला अटक : नारळीबाग परिसरात शुक्रवारी चोरीच्या प्रयत्नातील शेख अमजद शेख गफूर (२५) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे वेदांतनगर परिसरातून चोरलेले तीन मोबाइल आढळून आले. त्यानंतर आणखी मोबाइल चोरीच्या प्रयत्नात असताना गांगुर्डे यांच्या पथकाने त्याला पकडले. ही कारवाई निरीक्षक अशोक गिरी, अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

बातम्या आणखी आहेत...