आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्नडच्या राजकारणात नवा टि्वस्ट:अटकेतील हर्षवर्धन जाधव अन् पत्नी संजना यांचे पॅनल समाेरासमाेर; अकरावीतील आदित्य जाधवांनी केली वडिलांच्या पॅनलची घाेषणा

कन्नड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्य जाधवांनी पत्रकारांच्या खाेचक प्रश्नांची कसलेल्या नेत्याप्रमाणे दिली उत्तरे

कन्नडच्या राजकारणात मंगळवारी नवीन टि्वस्ट पाहायला मिळाला. मारहाण प्रकरणात पुण्यात अटकेत असलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलची घोषणा अकरावीत शिकत असलेले त्यांचे सुपुत्र अादित्य जाधव यांनी केली. विशेष म्हणजे हर्षवर्धन यांचे पॅनल हे त्यांच्याच पत्नी व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या समोर उभे करण्यात आले. आदित्य यांनी वडिलांच्या अनुपस्थितीत मंगळवारी कन्नडमध्ये पत्रकार परिषद आयोजित करून पॅनलची अधिकृत घोषणा केली. तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हर्षवर्धन राजकारणात सक्रिय होत असल्याचे यावेळी त्यांनी सर्व पत्रकारांना सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत रायभान जाधव यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. नवख्या आदित्य यांनी पत्रकारांच्या खोचक प्रश्नांनाही अतिशय समर्पक उत्तरे दिली. हर्षवर्धन अटकेत असताना आदित्य यांनी स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली. यानिमित्ताने स्वतःचीही राजकीय वाटचाल सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सोबत असल्याचे सांगत तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

आदित्य जाधवांनी पत्रकारांच्या खाेचक प्रश्नांची कसलेल्या नेत्याप्रमाणे दिली उत्तरे

- उ . घटनेने सर्वांना निवडणुकीत उभे राहण्याचा हक्क दिलेला आहे. त्यामुळे कुणी निवडणुकीला सामोरे जावे अथवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. घटनेने दिलेले हक्क काेणी बजावत असेल तर त्यात वावगे वाटण्यासारखे काही नाही.

> प्र. वडील राजकारणात असताना अनेक माेठ्या नेत्यांसाेबत त्यांचे वाद झाले?

- उ. राजकारणाात शेतकऱ्यांसाठी लढताना व त्यांना न्याय मिळवून देताना ह्या गाेष्टी हाेतच असतात. समाजातील याच घटकांसाठी ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय हाेत अाहेत.

> प्र. वाद झालेले ते माेठे नेते म्हणजे नेमके कोण आहेत?

- उ. ज्या माेठ्या नेत्यांसाेबत वाद झाले ते वैयक्तिक प्रश्नांवर झाले नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झाले. त्यामुळे काेणाचेही नाव घेणे संयुक्तिक हाेणार नाही.

> प्र. पॅनलबाबत वडिलांशी चर्चा झाली का?

- उ. नाही. अद्याप त्यांच्याशी काही बाेलणे झाले नाही. पण, माझे अाजाेबा रायभान यांच्या नंतर वडिलांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. अाता ते येथे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वत: हा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...