आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषीदुत:कनकसागज येथे कृषी दुतांचे आगमन व संवाद ; गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात केले स्वागत

वैजापुर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, देहेगाव येथील सातव्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे ( कृषीदुतांचे ) ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी वैजापूर तालुक्यातील कनकसागज येथे स्वागत करण्यात आले. मागील दोन वर्षापासुन सदर कार्यक्रम कोरोणाजन्य परिस्थितीमुळे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत होता परंतु कोविड परिस्थीती सुधारल्यामुळे यावर्षी हा कार्यक्रम ऑफलाईन राबविण्यात येत आहे.

दोन वर्षानंतर प्रत्यक्ष शेतीची माहिती घेण्यासाठी कृषीदुत गावात आल्यामुळे गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.यावेळी कृषीदुताना शेतीची माहिती देताना सरपंच किसन अंबादास भुजाडें व समस्त गावकरी उपस्थीत होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बैनाडे, कार्यक्रम अधिकारी प्रा.पगार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत शुभम डोळेवार, राहूल ढवळे,सुदाम डोरनालपल्ले, विकास घायट, दिपक गायकवाड,मयूर गायकवाड, गणेश घुगे, अतुल गायकवाड, गिल्लाबत्तीनी हर्षवर्धन यांनी शेतक-याकडून खरीप हंगामातील पिकाविषयी सविस्तर माहिती घेतली.

बातम्या आणखी आहेत...