आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापळशी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या १४ फुटी अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण रविवारी करण्यात आले. या पुतळ्याची ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादोव’ या जयघोषाने सबंध परिसर दुमदुमला. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
येत्या १९ फेब्रुवारी रोजी, शिवजयंतीच्या दिवशी या पुतळ्याचे पूजन, अभिषेक करून अनावरण करण्यात येणार आहे. नारेगाव येथील निरंजन आर्किटेक्टकडून हा अश्वारूढ पुतळा तयार करून घेण्यात आला आहे. पळशी शहर व बकापूर येथील प्रमुख सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नेत्यांसह ग्रामस्थांनी पिसादेवी गावापासूनच शमिरवणूक काढली. प्रत्येक घरावर झेंडे लावले होते. या वेळी आत्माराम पळसकर, नानासाहेब पळसकर उपसरपंच अय्युब पठाण यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.