आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:महाराष्ट्रातील रिटेल क्षेत्रामध्ये एक्सलंट रिटेलर्सचे आगमन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील रिटेल क्षेत्रात जोरदार पदार्पण करणाऱ्या एक्सलंट रिटेलर्स या कंपनीने किराणा मालाचे किरकोळ विक्रेते, छोटे मोठे किराणा दुकान, सुपरशॉपी, सुपर मार्केट यांच्यासाठी रिटेल सिस्टिम महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चालू करण्याचा निर्णय घेतलाय. यात स्वयंपाकघरात लागणाऱ्या सर्व वस्तू, ज्यात सर्व प्रकारचे मसाले, रेडी टू मिक्सचे प्रोडक्ट्स, लोणचे, सॉस, जाम, सिरप, लहान मुलांचे चॉकलेट्स, नमकीन प्रोडक्ट्स, पर्सनल केअर व होम केअर्सचे प्रोडक्ट्स अशा ५५० हून अधिक वस्तूंचा समावेश आहे. आगामी ६ महिन्यांत ३ हजारांवर प्रोडक्ट्स आपल्या रिटेल सिस्टिममध्ये समाविष्ट करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. महाराष्ट्रात सोयीस्कर पद्धतीने नवीन रिटेल सिस्टिम राबवण्यासाठी एक्सलंट रिटेलर्स कंपनीने एक सॉफ्टवेअर डेव्हलप केले आहे. या माध्यमातून रिटेल दुकानांशी व्यवसाय करणे सोपे होणार आहे. प्रत्येक रिटेल दुकानदारास हे सॉफ्टवेअर मोफत दिले जाईल. या माध्यमातून रिटेल दुकानदार दुकानातूनच विक्रीसाठी लागणाऱ्या वस्तू आर्डर करू शकतात. आर्डर केलेल्या वस्तू रिटेल दुकानदारांना आपल्या दुकानापर्यंत पोहोच मिळणार आहे. यासाठी एक्सलंट रिटेलर्सचे यांना संपूर्ण महाराष्ट्रात शहर, तालुक्याच्या ठिकाणी डिस्ट्रिब्युटर नेमायचे आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एका सुपर स्टॉकिस्टची नेमणूक करावयाची आहे. जेव्हा रिटेल दुकानदार सॉफ्टवेअरद्वारे आर्डर करेल तेव्हा ती आर्डर डिस्ट्रिब्युटरकडे येईल व तीच आर्डर डिस्ट्रिब्युटर पुढे सुपर स्टॉकिस्टकडे पाठवेल. आर्डरप्रमाणे सुपरस्टॉकिस्ट मटेरियल एक्सलंट रिटेलर्सच्या बॅगेत पॅकेजिंग करून ती डिस्ट्रिब्युटरमार्फत रिटेलरकडे पाठवेल.

पेमेंटसाठी सॉफ्टवेअरमध्ये आर्डरसह पेमेंट, आर्डर डेलिवर झाल्यानंतर पेमेंट व क्रेडिट पेमेंट, असे आप्शन दिलेत. याच्या वापरातून व्यवसाय वाढवू शकतात. डिस्ट्रिब्युटरला व्यवसायवाढीस, रिटेल दुकानदारांना संपर्क करून प्रोडक्टबद्दल माहिती देऊन प्रोडक्ट घेण्यास प्रवृत्त करण्याकरिता एक्सलंट रिटेलर्सकडून सेल्स एक्झिक्युटिव्ह व सुपरस्टॉकिस्टला एरिया सेल्स मॅनेजर मिळेल. एक्सलंट रिटेलर्स यांनी उत्तम दर्जाची रिटेल सिस्टिम यंत्रणा उभारलीय. रिटेल क्षेत्रात नवीन व्यवसाय शोधणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच ठरेल.

बातम्या आणखी आहेत...