आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शनाचा उपक्रम:प्रल्हाद महाराजांच्या पादुकांचे आगमन, शोभायात्रेने स्वागत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रल्हाद महाराज यांच्या पादुकांचे औरंगाबादेत मंगळवारी आगमन झाले. गजानन महाराज मंदिरापासून त्यांची शोभायात्रा काढण्यात आली. भक्तांनी उपासना व शेजारती केली. येथे गुरुवारी काकडा आरती, महानैवेद्य शुक्रवारपासून सायं उपासना होणार आहे. १९८० सालापासून पादुकांचे पूजन : बुलडाणा येथील प्रल्हाद महाराजांचा जन्म वेणी येथे झाला. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राम-नामाचा जप, प्रचार, प्रसार केला. या वेळी सचिन जोशी म्हणाले की, २००० सालापासून औरंगाबादेत पादुकांचे आगमन होते. रामनामाचा जप व प्रचार-प्रसार करण्यात येत आहे.

सद्गुरू सेवा मंडळाच्या वतीने विविध सामाजिक कार्य : सदगुरू सेवा मंडळाच्या वतीने महाराजांच्या पुण्यतिथीला रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच पूर्वांचल वसतिगृहामधील पाच ते सहा मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच महाराजांच्या पादुका संपूर्ण महाराष्ट्रभर नेण्यात येतात. आतापर्यंत साडेतीन कोटी जप केलेले आहेत. याबरोबरच तरुण पिढी व्यसनमुक्तीपासून दूर राहावी यासाठी मार्गदर्शनाचा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...