आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृत्तवेध:काश्मिरी पंडित आणि त्‍यांचे दुु:ख

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पिढ्यान् पिढ्या जखमांतून वाहत असलेले दुःख

तीस वर्षांत काश्मिरी पंडितांच्या दु:खावर अनेक चित्रपट बनले आहेत, पण एवढी चर्चा, एवढा वाद कधीच झाला नाही. आता तसे होत असेल तर त्यात काही गैर नाही. व्हायलाच हवी, जेणेकरून डोळे पुसण्याची हिंमत येऊन सर्व वेदना वाहून जावी.

असह्य दु:खाची सल पिढ्यान् पिढ्या जखमांतून वाहते. स्पर्श करताच त्या चिघळतात. काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांच्या स्वभावात अनिर्णय आणि संभ्रम हा मोठा दोष होता, हे खरे असल्याचे इतिहासही सांगतो. याचा पुरेपूर फायदा शेख अब्दुल्ला यांनी घेतला. प्रथम जातीय आंदोलनातून आणि नंतर ‘महाराजा काश्मीर छोडो’ आंदोलनाद्वारे. गोपाळ स्वामी अय्यंगार आणि मेहेरचंद महाजन यांच्यासारखे कुशल प्रशासकही शेख यांच्या आंदोलनाचा वेग रोखू शकले नाहीत.

काश्मिरी पंडितांना जातीय दंगलींचा फटका बसला, ही वस्तुस्थिती आहे. या सत्यापेक्षा त्यांचे दु:ख मोठे आहे, असे म्हणता येईल. खरं तर जे दहशतवादी काश्मिरी पंडितांचे शेजारी, विद्यार्थी आणि मित्र होते, त्यांनीच त्यांच्या शेजारी, शिक्षक आणि मित्रांना मारले. शेजारी राहताना त्या दहशतवाद्यांना हे पुरेसे समजले होते की, इथे आपली सत्ता प्रस्थापित करायची असेल तर पंडितांचे मर्म, आत्मा ठेचून काढावा लागेल. मर्म म्हणजे पंडितांच्या देवी-देवता, ज्यांची ते पूजा करत. मंदिरे आणि शिल्पे, ज्यात त्या देवी-देवता स्थापन होत्या. धर्मग्रंथ, ज्याला ते पवित्र मानत आणि त्यांच्या लेकी-सुना, ज्यांच्या सन्मानाचे त्यांना रक्षण करायचे होते. या कारणामुळेच ‘द कश्मीर फाइल्स’ची आज सर्वाधिक चर्चा होत आहे. आणि देशातील प्रत्येक हिंदू त्या काश्मिरी पंडितांच्या वेदना स्वतःच्या समजत आहे, अशी वेळ आता आली आहे. वास्तविक, सत्तेत किंवा सरकारमध्ये बसलेल्या लोकांना सामान्य माणसाच्या वेदना समजत नाहीत, तेव्हा ते कोणत्या तरी दुःखद चित्रपटात किंवा कथा वा कथानकात त्याचे समाधान शोधतात. आज तेच होत आहे. हे फक्त काश्मिरी पंडितांबाबतच नाही, तर फाळणीच्या वेळीही लोकांनी हेच पाहिले आणि अनुभवले होते. विशेषत: पंजाबी, सिंधी आणि संपूर्ण समाजाला फाळणीचा फटका बसला होता. त्यांच्या लेकी-सुनांना ते घेऊन गेले होते. त्यांची शेते आणि कोठारे त्यांच्या मालकांची वाट पाहत राहिली. त्यांची भरलेली घरे मागे राहिली. एकेकाळी मक्याचे दाणे आणि गव्हाच्या गाठींचा सुगंध दरवळणाऱ्या शेतांतील माती रक्ताने माखलेली होती. त्यांच्या खुंटीला बांधलेल्या गायी तळमळत राहिल्या… पण त्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी कुणीच आले नाही. कोणतेही सरकार, सरकारमध्ये बसलेली कोणतीही व्यक्ती इतकी निष्ठूर होऊ शकते का? लोकांनी जे दृश्य पाहिले ते कधीही न संपणाऱ्या कथेसारखे होते. दंगे पसरले होते. लोक रात्रीतून धावत सुटायचे आणि गावांच्या व शहरांच्या सीमेवर मारले जायचे. अनेक कोस चालल्यानंतर ते मृत सापडायचे. डोंगरासारखे दु:ख आणि ते हलकं करायला कुणीच नाही! अश्रू तर येणारच. अनेक पिढ्यांनंतर असले तरी दु:ख ते दु:खच. त्यावर काही औषध असते?

‘पिंजर’ची वेडीच वाचा! ती इतकी भयंकर होती की, ती रस्त्यावर येताच महिला धावत जाऊन आपली मुले लपवत असत. पिंजारलेले केस, धुळीने माखलेल्या जटा पाहून जणू तिने जन्मल्यापासून अंघोळ केली नसल्याचे वाटायचे. वाळलेल्या, जळालेल्या शरीरावरून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण होते. तो फक्त रक्त-मांसाचा जिवंत पुतळा होता. त्या पुतळ्यावरसुद्धा कोणी तरी वैर काढले. वेडी गरोदर राहिली. मांसाचा एक गोळा होता, त्याला स्वतःचीही शुद्ध नव्हती… फक्त हाडांचा सापळा… गिधाडांनी तेही फाडून खाल्ले… विचार करून बायका थकून जायच्या. एकेदिवशी गावाबाहेर ती वेडी एका मुलाला जन्म देऊन मरण पावली. पुरोने त्या मुलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळायला सुरुवात केली. ज्या समाजाने त्या विक्षिप्त संरचनेलाही पशुत्वाचा गर्भ बनवला होता, तो समाज धर्माचा ठेकेदार म्हणून बाहेर पडला आणि दुसऱ्या समाजाच्या स्त्रीने ते पोर पुरोपासून हिसकावून घेतले, हे केवढे दुर्दैव! जिऱ्याचे तुकडे खाऊन अर्भकासाठी आपल्या वक्षात दूध उतरवणारी पुरो मुलासाठी रडत राहिली, पण कोणी काहीही ऐकले नाही. हेच दु:ख असते आणि म्हणूनच ते पिढ्यान् पिढ्या सरपटत राहते.

नवनीत गुर्जर नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर navneet@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...