आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोक कलावंतांनी गुरुवारी विभाग आयुक्त कार्यालयासमोर आपली कला सादर करत त्यांच्या समोरचे प्रश्न मांडले लोक कलावंतांना मिळणारे मानधन अतिशय पूर्ण काळापासून औरंगाबाद जिल्ह्यातील कलावंतांची निवड प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे आंदोलन करण्यात आल्याची माहिती लोकसलास महोत्सव समितीचे अध्यक्ष एकनाथराव यांनी दिली आहे.
औरंगाबाद जिल्हयातील वृद्ध, कलावंताना शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने मानधन दिले जाते. औरंगाबाद जिल्हयातील या योजनेची कलावतांची निवड प्रक्रिया रखडलेली आहे. कोविडमुळे गेली 2 वर्षे प्रक्रिया होवू शकली नाही.
कलावंतांनी केली कला सादर
लोक कलावंत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जमा झाले होते यावेळी त्यांनी विविध कलाप्रकार सादर केले. यावेळी त्रिभुवन यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सागितले की आमच्या कलावंतांच्या वतीने पुर्वीचे मानधन वाढवून मिळावे अशी आमची आग्रहाची मागणी असून याबाबत आम्ही शासनाला निवेदन देखील दिलेले आहेत.मागणी आहे. अ वर्गासठी 3150 रुपयेमानधन मिळत आहे. महागाईमुळे मिळणाऱ्या या मानधनातून घरचा खर्च भागविणे शक्य होत नाही. 'ब' वर्गासाठी रु.2800-, 'क' वर्गांतील कला कारासाठीकेवळ 2250 रुपये इतकी मानधन मिळते
मानधनात वाढ करा
यावेळी लोकांचा वतीने मानधनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 'अ' वर्गासाठी रु.7500 रुपये 'ब' वर्गासाठी रु.6500 आणि 'क' वर्गासाठी रु.5500 मानधन देण्यात वाढ करण्यात यावी. कलावंतांना कलेचे संवर्धन व उद्योग व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र वामनदादा कर्डक नावाने महामंडळ स्थापन करून भरपूर निधी मंडळास सुपूर्द करावा. कलावंतांना घरकुल योजनेमध्ये राखीव कोठा असावा.
कलावंतांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी. कलावंतांना शासनाने प्रमाणित केलेले ओळखपत्र देण्यात यावे.तमाशा कलावंतांना कला सादर करण्यासाठी सायं.9 ते 4 वाजेपर्यंत वेळ उपलब्ध करुन देवून व त्या कालावधीत ध्वनीक्षेपन वाजविण्यास त्यांना सवलत देण्यात यावी. तसेच, तमाशा कलावंतांना ग्रामीण भागात कार्यक्रम करतांना पोलीस सरंक्षण देण्यात यावे. जेणेकरुन, त्यांच्या हल्ला होणार नाही, याची दखल यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.