आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:तेजस प्रकल्पामुळे राज्यात 51 हजार शिक्षक,14 लाख विद्यार्थी फाडफाड बाेलू लागले इंग्रजी

औरंगाबाद / महेश जोशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 95 टक्के शिक्षक, 93 टक्के विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुुधारले

इंग्रजी ही जागतिक महत्त्वाची भाषा आपल्याला बोलता येत नाही, असा न्यूनगंड अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांतही असतो. ही बाब ओळखून राज्याच्या शिक्षण खात्याने ब्रिटिश कौन्सिल आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने कोरोना काळात सरकारी शाळांत “तेजस’ प्रकल्प राबवला. यामुळे ३६ जिल्ह्यांतील ५१ हजार शिक्षक आणि १४ लाख विद्यार्थी आता फाडफाड इंग्रजी बोलू लागले आहेत.

लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण झाले. या काळात सर्वाधिक फटका बसला तो शाळांना. संसर्ग टाळण्यासाठी सर्वात आधी शाळा, महाविद्यालये बंद झाली. मात्र, लॉकडाऊनच्या या काळाचा सकारात्मक फायदा घेण्यासाठी शिक्षण विभाग सरसावला. ब्रिटिश कौन्सिल व टाटा ट्रस्टच्या सहकार्य तेजस प्रकल्प त्यांनी राबवला. त्याचे परिणाम समोर आले आहेत. या प्रकल्पामुळे ९५% शिक्षक, ९३% विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुुधारले आहे.

३५०० ऑनलाइन लेक्चर : तेजस हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून पारंपरिक शिक्षण पद्धतीला टाळत शिक्षण, प्रशिक्षण यात अपेक्षित आहे. कोरोनाकाळात तेजसचे ऑनलाइन लेक्चर सुरळीत सुरू होते. लॉकडाऊनच्या काळात वर्षभरात सरकारी प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ३५०० हून अधिक ऑनलाइन लेक्चर आयोजित करण्यात आलेे. हसत-खेळत, प्रकल्पांच्या माध्यमातून इंग्रजीचे धडे देण्यात आले. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ७७५ टीचर्स अॅक्टिव्हिटी ग्रुप आणि २४० केंद्रप्रमुखांकडे देण्यात आली.

...अन् मुले इंग्रजी बोलू लागली
तेजसचा २० मार्च राेजी ऑनलाइन समारोप झाला. या वेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, या उपक्रमामुळे प्राथमिक शिक्षक व विद्यार्थ्यांतील कौशल्ये, अध्ययन क्षमतेत वाढ झाली. ब्रिटिश कौन्सिल इंडियाच्या संचालिका बार्बरा विकहॅम ओबीई म्हणाल्या, तेजसमुळे १४ लाख शिक्षकांचे इंग्रजी अध्यापन कौशल्य सुधारले. याचा विद्यार्थ्यांना लाभ होईल. टाटा ट्रस्टच्या शिक्षणप्रमुख अमृता पटवर्धन म्हणाल्या, हे शिक्षकांच्या प्रभावी विकासासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे.

बातम्या आणखी आहेत...