आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर नाका ते एएस क्लब या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे पुलावरून बस, ट्रॅव्हल्स, ट्रक आदी अवजड वाहनांना ३० सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान बंदी आहे. तरीही शहरातून वाळूजच्या दिशेने धावणाऱ्या सिटी बस, कंपन्यांच्या बस व इतरही अवजड वाहने बिनदिक्कत ये-जा करत आहेत. अशा ४३६ वाहनांवर मागील १ ऑगस्ट ते ९ नोव्हेंबरदरम्यान कारवाई करून त्यांना २ लाख ६५ हजारांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन कामे यांनी दिली.
या रस्त्यावर वाहतूक बंदी असतानाही सिटी बसचालक ये-जा करत आहेत. नगर नाका येथून पुढे येणारे सिटी बसचालक बजाजनगर, साजापुर, रांजणगावच्या दिशेने जाण्यासाठी सिडको ग्रोथ सेंटर येथील मार्गाचा वापर करतात. रहिवासी परिसरातून ये-जा करत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिटी बससोबतच कंपन्यांच्या बसही माेठ्या संख्येने ये-जा करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.