आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवारी जी-२० साठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. यादरम्यान म्हाडा कॉलनीतील सातवीतील तीन मुलींचे अपहरण झाल्याचा कॉल आला. पोलिसांची एकच धांदल उडाली. मात्र, १६ तासांनी मुली पुन्हा त्याच परिसरात सापडल्या. परंतु, आई-वडील वेळ देत नाहीत म्हणून मी घर सोडल्याचे यातील एका मुलीने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे त्याच दिवशी तिचा वाढदिवस होता.
१३ वर्षांची नेहा (नाव काल्पनिक आहे) इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सातवीत शिकते. त्याच परिसरातील कल्पना व सायली (दोन्ही नावे काल्पनिक आहेत) या दाेघी नेहाच्या मैत्रिणी आहेत. त्या तिघीही रोज ट्यूशनला सोबत जातात. मंगळवारीही नेहा सायंकाळी ६ वाजता ट्यूशनला गेली. मात्र, ती परतलीच नाही. त्यामुळे पालकांनी सायली व कल्पनाच्या घरी चौकशी केली असता, त्यादेखील घरी नसल्याचे कळाले.
मनमाड गाठून पुन्हा शहरातही परतल्या : नेहाने स्वत:हून घर सोडले होते. त्या तिघी मंगळवारी सकाळी त्याच परिसरात मिळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यात धक्कादायक कारण समोर आले. नेहाने आई-वडील वेळच देत नाही. मी जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यामुळे पाेलिसही क्षणभर अवाक झाले. जाताना ५०० रुपये घेऊन दोन्ही मैत्रिणींना फिरून येऊ, असे म्हणत सोबत नेले. रात्री रेल्वेने मनमाड गाठले. सकाळी पुन्हा रेल्वेनेच छत्रपती संभाजीनगरात परतल्या. तेथून रिक्षाने म्हाडा परिसरात उतरल्या. मात्र, घरी जाण्याआधीच पोलिसांच्या हाती लागल्या.
रेल्वेस्थानक, बसस्थानकावर पाेलिसांकडून शाेध शोधाशोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. त्यामुळेे नेहाच्या वडिलांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना ही घटना कळविली. प्रभारी निरीक्षक संभाजी पवार यांनी तत्काळ पथके रवाना केली. सीसीटीव्हीचे फुटेज गोळा करण्याचे काम सुरू झाले. रेल्वेस्थानक, बसस्थानकावर शोध घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.