आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय दहा दिवसांच्या रजेवर गेले. त्यांचा कार्यभार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे आला आणि त्यांनी पावसाळा सुरू झाल्यावर सहाऐवजी पाच दिवसांआड पाणीपुरवठ्यासाठी तीन कलमी योजना सोमवारी (१३ जून) जाहीर केली. मोठ्या हॉटेलांच्या नळ जोडणीवर मीटर, काही विहिरींचे अधिग्रहण, विहिरींवरच टँकर भरणा अशी ही तीन कलमे आहेत. या उपाययोजना महत्त्वाच्या असल्या तरी हायड्रॉलिक सिस्टिम (जलकुंभ भरणे) सुरळीत करणे जास्त महत्त्वाचे, फायद्याचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. १३ जून रोजी चव्हाण यांनी मनपा अधिकाऱ्यांची रात्री १२ पर्यंत बैठक घेतली. त्यातील निर्णयाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात ताज, रामा, अतिथी, अॅम्बेसेडर आदी मोठ्या हॉटेलांच्या नळ जोडणीला मीटर बसवले जाईल. जलकुंभ भरण्यासाठीच्या पाइपलाइनवरील कनेक्शन काढले जातील. मुबलक पाणी असलेल्या शक्कर बावडी, बैलगोडा, दत्त मंदिर, समर्थनगर येथील विहिरी अधिग्रहित होतील. या सर्व कामांसाठी मुंबई प्रांतिक अधिनियम १९४९ मधील ६७ (३) (सी) कलम वापरले जाईल. त्यामुळे निविदा न काढता कामे करता येतील. या वेळी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे उपस्थित होते. १५०० नळांना मीटर बसणार : जलकुंभांच्या फीडर लाइनवरील कनेक्शन तोडण्याची कामगिरी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे फत्ते करतील. मुख्य लाइनवरील सुमारे १५०० व्यावसायिक नळ कनेक्शनला मीटर बसवण्यात येतील. विहिरीतील पाणी मी स्वत: प्यायले अधिग्रहित केलेल्या विहिरींचे पाणी टँकरद्वारे वसाहतींना पिण्यासाठी देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले की, मी स्वत: या विहिरींचे पाणी पिऊन पाहिले आहे. विहिरींचे पाणी वापरणे धाडसाचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या उपाययोजनांविषयी मनपा पाणीपुरवठा विभागाचा २० वर्षांचा अनुभव असलेले निवृत्त शहर अभियंता एम. डी. सोनवणे यांना दिव्य मराठी प्रतिनिधीने विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले ते असे - जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेला हिशेब नक्षत्रवाडीतून सहा, कोटला कॉलनीतून ३३ टँकर जायकवाडीच्या ६ लाख लिटर पाण्यातून भरले जातात. हे ३९ टँकर आता नक्षत्रवाडीतील जहागीरदार यांच्या दोन विहिरीतून भरण्यात येतील. मोठ्या हॉटेलांच्या नळ जोडणीवर मीटर लागणार तज्ज्ञांच्या मते : हायड्रॉलिक सिस्टिम सुधारणा महत्त्वाची दहा दिवसांत चमत्काराचे प्रयत्न पांडेय रजेवर जाताच चव्हाण १० दिवसांत चमत्कार करणार, अशी चर्चा सुरू झाली. यासंदर्भात विचारल्यावर चव्हाण म्हणाले की, ‘आमचे प्रयत्न सुरू आहेत.’ दिव्य मराठी एक्स्पर्ट व्ह्यू विहिरींचे पाणी वसाहतींना देणे धाडसाचा निर्णय आहे. विहिरीतील पाण्याची पीएच, टीडीएस पातळी आणि बॅक्टेरिया तपासणी करून त्याचा अहवाल योग्य आला तरच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकेल. ही तपासणी रोज करणे अत्यावश्यक आहे. नाहीतर गडबड होईल मोठ्या हॉटेलांना मनपा नव्हे, एमआयडीसी पाणी देते. त्यामुळे तेथे मीटर एमआयडीसीमार्फतच बसवावे लागेल. पाणीटंचाई हायड्रॉलिक सिस्टिम मोडल्यामुळे झाली आहे. जलकुंभ भरण्यासाठीच्या लाइनवरील कनेक्शन आधी तोडले पाहिजेत. नक्षत्रवाडीतून एक्स्प्रेस लाइन फक्त सिडकोतील जलकुंभ भरण्यासाठी टाकली होती. पहिली काही वर्षे त्यातून कुंभ व्यवस्थित भरले गेले. नंतर गारखेडा, शिवाजीनगरात कनेक्शन देण्यात आल्याने सिडको - हडको होरपळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.