आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बसशिवाय पर्याय नाही:नवीन डेपोत रुजू हाेताच महिला कंडक्टरांकडून बसला दे धक्का

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गाव-खेड्यांपर्यंत जाण्यासाठी महामंडळाच्या एसटी बसशिवाय पर्याय नाही. मात्र, डेपाेतून खटाऱ्या बसेस चालू असतील तर देव करो अन् प्रवासी सुखरूप पोहचो, असेच म्हणावे लागते. शुक्रवारी दुपारी २:३० वाजता एएस क्लब चौकात अहमदनगरकडून औरंगाबादकडे येणारी एसटी बस (एमएच १४ बीटी ३७५१) अचानक बंद पडली. त्यामुळे महिला कंडक्टर संगीता वाघमारे यांना बसला धक्का देण्याची वेळ आली. विशेष म्हणजे या वाहकाचा नवीन डेपाेत रुजू हाेण्याचा पहिलाच दिवस हाेता.

सध्याच्या स्थितीत एसटी महामंडळात अनेक बसेस जुन्या व दुरुस्तीला आल्या आहेत. तरीसुद्धा त्या विविध मार्गांवर चालवल्या जात आहेत. अहमदनगर डेपोची बस शुक्रवारी दुपारी औरंगादकडे येत होती. अचानक एएस क्लब रिंग रोडच्या चौकात वळण घेताना बंद पडली. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या जड वाहनांना वळण घेण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. बस, ट्रक, कंटेनर जाण्यासाठी रस्ताच नव्हता. यादरम्यान, बसमधून वाहक वाघमारे यांना खाली उतरावे लागले. चालकाने अनेकदा प्रयत्न करूनही बस सुरू होत नव्हती. वाघमारेंचा अहमदनगर डेपोत रुजू हाेण्याचा पहिलाच दिवस हाेता. त्यामुळे बसला धक्का मारण्यासाठी त्यांना रस्त्यावरील इतर वाहनधारकांना विनवणी करावी लागली. या वेळी काही वाहनधारक धक्का मारायचा, असे ऐकल्यावरच निघून जायचे. कुणीही येत नसल्याचे पाहून दोन नागरिकांसह एका वाहतूक पोलिसासह महिला वाहक वाघमारेंना धक्का मारावा लागला. त्यानंतर पंधरा मिनिटांनी बस सुरू झाली. मात्र, अशी घटना निर्जन स्थळी घडल्यास काय होईल, याचा अंदाज काुणीही बांधू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून चांगल्या बसेस द्याव्यात.

बातम्या आणखी आहेत...