आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपराध:पती कंपनीमध्ये जाताच घरात घुसून पत्नीचा विनयभंग; गुन्हा दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पती खासगी कंपनीत कामाला जाताच घरात घुसून आतून कडी लावून २२ वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या चरणसिंग भजनलाल सैन (रा. हरिओमनगर, रांजणगाव) विरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ३१ डिसेंबरला रात्री ९ वाजता वाळूज परिसरात घडली.

घटनेच्या दिवशी नियमाप्रमाणे रात्रपाळीसाठी पती कंपनीत सायंकाळी ७ वाजता कामावर गेले. त्यानंतर दोन तासांनी घरावर पाळत ठेवून असणारा पीडितेच्या ओळखीचा आरोपी चरणसिंग घरात घुसला. त्याने दरवाजाची आतून कडी लावून घेतली. त्यानंतर वाईट हेतूने महिलेला जवळ घेत तिचा विनयभंग केला. त्यामुळे पीडिताने आरडाओरड करताच शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर चरणसिंगने धूम ठोकली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...