आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी ​​​​​​​ डॉ. अविनाश बारगजे ​​​​​​​यांची निवड

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्नित तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी बीडच्या डॉ. अविनाश बारगजे यांची, तर महासचिवपदी मिलिंद पठारे यांची बिनविरोध निवड झाली. औरंगाबादचे नीरज बोरसे हे कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्त झाले आहेत.

औरंगाबादेत झालेल्या सर्वसाधारण सभेत तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक ॲड. राजकुमार कश्यप (उत्तर प्रदेश) व औरंगाबाद खंडपीठाचे वकील तथा निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. विजय ढाकणे यांच्या निरीक्षणाखाली सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया झाली.

उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष- विनायक गायकवाड (मुंबई उपनगर) व धुलीचंद मेश्राम (गोंदिया), सचिव सुभाष पाटील (रायगड), खजिनदार व्यंकटेश्वरराव कररा (रत्नागिरी), नीरज बोरसे (औरंगाबाद), अजित घारगे (जळगाव) व सतीश खेमसकर (चंद्रपूर) यांची कार्यकारी सदस्यपदी निवड झाली आहे. प्रवीण बोरसे व सुशांत भोयार अतिरिक्त उपाध्यक्ष असतील.

बातम्या आणखी आहेत...