आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन:पणजीतील संमेलन स्वागताध्यक्षपदी डॉ. मुरहरी केळे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्त सृजन साहित्य पत्रिका, औरंगाबादच्या वतीने पणजी-गोवा येथे ११ सप्टेंबर २०२२ रोजी पहिल्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक व महावितरणचे अधिकारी डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. केळे यांनी अहिल्यादेवी होळकर, संत वाणी या दोन पुस्तकांचे संपादन केले असून “जगी ऐसा बाप व्हावा’, “शब्दशिल्प’ व “नानी’ ही त्यांनी लिहिलेली मराठी पुस्तके गाजलेली आहेत. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या “पॉवर डिस्ट्रिब्यूशन फ्रँचायझी’ या शोधनिबंधावर आधारित दोन इंग्रजी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. डॉ. मुरहरी केळे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील केळेवाडी या गावचे ते मुळ रहिवाशी आहेत.

बातम्या आणखी आहेत...