आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:आशियाई बॉडीबिल्डिंग संघटनेच्या सरचिटणीसपदी डॉ. संजय मोरे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिस्केक (किर्गिजस्तान) येथे आशियाई बॉडीबिल्डिंग व फिटनेस फेडरेशनची सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत औरंगाबादच्या डॉ. संजय मोरे यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे २००७ ते २०२२ अशा सलग चौथ्यांदा त्यांना या पदावर सर्वोनुमते काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील भारतात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत. ‘यापूर्वी मी आशियातील पदावर काम करताना भारतातील खेळाडूंना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या. आता यापुढेही खेळाडूंसाठी काम करणार आहे, असे निवडीनंतर डॉ. संजय मोरे यांनी सांगितले.’

बातम्या आणखी आहेत...