आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन-६ येथील शिवदत्त हाउसिंग सोसायटीच्या दत्तमंदिरावर दत्तजयंतीनिमित्त कलशारोहण करण्यात आले. पंचधातूंचा हा कळस अहमदनगरमध्ये तयार करण्यात आला आहे. कलशारोहण केल्यानंतर गुरुवारी भंडाऱ्याने उत्सवाची सांगता झाली. दत्तजयंतीनिमित्त मंदिरात तीन दिवस गुरुचरित्र पारायण झाले.
कलशारोहण पूजेसाठी ब्रह्मचारी निरंजनानंद महाराज यांच्या हस्ते कलशपूजन झाले. या वेळी विठ्ठल आणि सुरेखा उनग्रवार तसेच सुरेश आणि शैला जोशी पूजेला बसले होते. या उत्सवात अरविंद जोशी, सुनील भगत, राजू कुलकर्णी, महेश देशमुख आणि उत्तमराव तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. लक्ष्मीकांत दहिभाते वास्तुविशारद आहेत. त्यांनीच मंदिराच्या वास्तूचे डिझाइन केले. या ठिकाणी गर्भगृहासोबतच सभामंडपही उभारले आहे. मंदिराच्या प्रांगणात नवरात्रोत्सवही जल्लोषात होतो.
१९ वर्षांनंतर प्राणप्रतिष्ठा
शिवदत्त सोसायटीत २००३ मध्ये दत्तात्रेयांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. डॉ. नरेंद्र वैद्य यांनी मूर्ती दान केली होती, तर अनिल चौधरी यांनी कलशदान केला आहे. सोसायटीत प्रत्येक उत्सव सर्वांच्या सक्रिय सहभागाने साजरा होतो. -मकरंद कुलकर्णी, माजी नगरसेवक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.