आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीतांची मैफल:सिंग अलाँग कराओकेमध्ये आशा भोसलेंच्या गीतांची मैफल रंगली

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निगाहें मिलाने को, ‘झुमका गिरा रे’, ‘ये लडका हाये अल्लाह कैसा है दीवाना’ अशा एकाहून एक सरस गीतांचा नजराणा सिंग अलाँग कराओकेच्या मैफलीत रसिकांना मिळाला. गानशारदा आशा भोसले यांच्या गीतांची मैफल जया महाजन यांच्या वतीने तापडिया नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आली होती.

या वेळी डॉ. विजय बोरगावकर, डॉ. ऋता बोरगावकर, माधुरी अदवंत-देशमुख आणि शांता महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. चारुलता रोजेकर यांनी प्रास्ताविक केले. मैफलीची सुरुवात जया महाजन यांच्या ‘भीनी भीनी भोर आयी’ या शास्त्रीय गीताने झाली. यानंतर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आशा भोसलेंच्या गाजलेल्या गीतांची मालिकाच सुरू केली.

प्रत्येक गाण्यागणिक मैफल उंचावर जात होती. गायकच नव्हे तर रसिकही मैफलीत एकरूप होऊन गाण्यांमध्ये साथ करत होते. या वेळी आयडीबीआयचे रिजनल हेड राजीवकुमार, उद्योजक रवी वतनी, निवासी उपजिल्हाधिकारी माधव निलावार, स्मार्ट सिटीचे मॅनेजर विष्णू लोखंडे, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील उपस्थित होते. दीपाली मुळे यांनी निवेदन केले, तर संतोष महाजन यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...