आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:किमान वेतनासाठी आशा, गट प्रवर्तकांचे आंदोलन

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशा व गट प्रर्वतकांना आरोग्य विभागात कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, त्यांना किमान वेतन २६ हजार रुपये द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोविडकाळात आशा वर्कर्स व गट प्रवर्तकांनी जीव धोक्यात घालून काम केले. अत्यल्प मानधनावर हे कर्मचारी काम करतात. कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युनियनच्या वतीने निदर्शने, मोर्चे, धरणे आंदोलने करण्यात आली. मात्र शासनाने कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याने निदर्शने करत संताप व्यक्त केला. तालुका पातळीवर समूह संघटक, एम.पी. डब्ल्यू. यांची मनमानी त्वरित थांबवावी, आशा वर्कर्स, गट प्रवर्तकांना दरमहा ५ तारखेला मानधन मिळावे. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात दामोदर मानकापे, मंगल ठोंबरे, पुष्पा पैठणे, ज्योती भोसले, वैशाली शिंदे, भाग्यरीती सोनवणे, पुष्पा शिरसाट आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...