आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मविआची सभा:निर्णय बेभान प्रसिद्धी वेगवान, सत्ताधाऱ्यांचा यावरच भर, कितीही गौरव यात्रा काढा फरक पडणार नाही - अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''निर्णय बेभान प्रसिद्धी वेगवान, फक्त त्यावरच शिंदे - फडणवीस सरकारचा भर आहे. कितीही गौरव यात्रा काढा, फरक पडणार नाही असा घणाघात काॅंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेवर

कितीही गौरव यात्रा काढा फरक पडणार नाही - अशोक चव्हाण

अशोक चव्हाण म्हणाले, आजची विराट सभा पाहिल्यानंतर कितीही गौरव यात्रा काढल्या तरी काहीही फरक पडणार नाही. विराट सभा जनतेच्या मनातील प्रतीक आहे. ही मन की बात नाही दिल की बात है. महाविकास आघाडी देवगिरी किल्ल्यासारखी ताकवाद मजबूत झाली. ती कुणीही फोडू शकत नाही. मराठवाड्यातील लोकांच्या भावना आहेत की, मविआचे सरकार जायला नको होते. आमच्यात किरकोळ मते होती ती आम्ही सावरून घेत होतो.

सरकार फोडले, चिन्हही ते घेवून गेले

अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात भाजपला रोखायचे असेल तर तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही ही भूमिका आम्ही सोनीया गांधींना पटवून दिली त्यानंतर मविआ स्थापन केली. अडीच वर्षांच्या कारकिर्दीला बोट लावण्याचे काम केले. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला आमदार गेले. पक्ष फोडला. चिन्हही घेवून गेले.

पक्षांतर कायदा गुंडाळून सत्ता स्थापन

अशोक चव्हाण म्हणाले, लोकशाहीला मारक फोडाफोडी होत असेल व पक्षांतर बंदी कायदा गुंडाळून राज्यात सत्ता आणली जात आहे. हे महाराष्ट्रात कधी घडले नाही. हे महाराष्ट्रात आता घडले ही शोकांतिका आहे. राहुल गांधींनी फक्त संसदेत प्रश्न विचारले होते. अदानींना वाचवण्याचे काम केंद्र सरकार का करीत आहे हे त्यांनी विचारले पण आवाज दाबण्यात आला.

लोकशाहीची विटंबना सुरू आहे

अशोक चव्हाण म्हणाले, राहुल गांधींना घर खाली करायला लावत आहे. लोकशाहीची विटंबना होत आहे हा प्रश्न केवळ राहुल गांधींपुरता नाही. जे बोलत आहे त्यांचा आवाज दाबला जात आहे. जे राहुल गांधी, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडू शकते ते आपल्याबाबतीत घडू शकते. लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला एकत्र यायला हवे.

उद्धव ठाकरेंसारखा भला माणूस पाहीला नाही

अशोक चव्हाण म्हणाले, राजकारण थोडे बाजूला ठेवू पण मला सांगावे वाटते की, उद्धव ठाकरेंसारखा एवढा भला माणूस मी पाहीला नाही. महाराष्ट्रातील अनेक प्रश्नावर निर्णय घेताना कधीही वेगळी भूमिका घेतली नाही. आम्हाला अडचणी होत्या. राजेश टोपेंचे कोरोनातील काम महत्वाचे होते. त्यांच्या नेतृत्वात चांगले काम आम्ही केले. उद्धव ठाकरेंचे कौतुक करायला हवे.

मुक्तिसंग्रामाबाबत ठराव घेतला नाही

अशोक चव्हाण म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवाचे वर्ष आहे. मराठवाड्याच्या कामासाठी पैसा द्यावा हे आम्ही सांगितले त्यावर ठाकरेंनी समिती नेमून 75 कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली. आम्ही सरकारमधून गेल्यानंतर सध्याच्या सरकारकडून निधी सोडा पण विधीमंडळात साधा मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे अभिवादनाचा करणारा ठरावही घेतला नाही. स्वातंत्र्यसैनिकांची उपेक्षा सध्याच्या सरकारने केली. हा अस्मितेचा विषय होता.

मराठवाड्याने काय पाप केले?

अशोक चव्हाण म्हणाले, मराठवाड्याने काय पाप केले होते. निर्णय बेभान प्रसिद्धी वेगवान, फक्त प्रसिद्धीवरच शिंदे फडणवीस सरकारचा भर, राज्याचे कर्ज सात लाख कोटींवर गेले आहे. बेरोजगारी, महागाईचे विषय सोडून गौरव यात्रा सुरू आहे. सर्व महापुरुषांचा आम्ही सन्मान करतो पण मराठवाडा तहानलेला आणि भुूकेला आहे त्याकडे लक्ष हे सरकार देत नाही.