आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षता:गोवा, मध्य प्रदेशची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कर्नाटकातील आमदारांना हलवणार, फुटीची भीती नाही - अशोक चव्हाण

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काॅंग्रेसचे आमदारांना बाहेर ठेवण्याचे कारण पक्ष फुटीची भीती वाटते असे नाही, तर दक्षता म्हणून हे सगळे केले जात असावे, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण शंनी व्यक्त केले आहे.

दरम्यान अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, सध्या देशात काहीही घडू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये वाईट अनुभव आलाय. मध्य प्रदेशात आणि गोव्यात तेच घडले आणि मग सरकारे पाडली. कर्नाटकात तर आलेले सरकार पाडले म्हणत खबरदारी म्हणून काँग्रेसच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

मागील अनुभवामुळे खबरदारी

कर्नाटकमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. काँग्रेस पक्षाने एकहाती बहुमत मिळवल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातल्या नेत्यांनीही हा पराभव मान्य करून विरोधी पक्षात बसण्याची तयारी दर्शवली आहे. या निकालावर देशभरातून अनेक नेते प्रतिक्रिया येत आहेत. यावर बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मागील काही अनुभव पाहता काँग्रेसची आलेली सत्ता पाडण्यात आली आहे. गोवा असो मध्य प्रदेश असो म्हणून काँग्रेस आमदारांना बँगलोरमध्ये स्थलातंरित करत आहेत.

जनतेचे प्रश्न महत्त्वाचे

अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, लोकांच्या प्रश्नांसदर्भात कुठला पक्ष काय करतो, काय बोलतो ते मतदारांना यात स्वारस्य असते. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया आपण पाहिल्या आहेत. तर दुसरीकडे बाजूला काँग्रेसचा जाहीरनामा लोकांना आकर्षक वाटला. यात महिलांसाठी पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत. महिलांना राज्य परिवहन विभागाच्या बसमधून विनामुल्य प्रवास करता येईल. महिलांना दर महिन्याला काही पैसे दिले जातील (त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार). बेरोजगार युवकांना भत्ता दिला जाईल. या अशा घोषणांमुळे महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे, असे चित्र दिसत आहे.