आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांचे आश्वासन:सफाई कर्मचाऱ्यांसाठी आश्रय योजना राबवणार; सफाई कर्मचारी मेळाव्यात पालकमंत्र्यांची ग्वाही

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी आश्रय योजना राबवली जाते. ती राज्यभरात लागू करण्याचा विचार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी औरंगाबादेत सांगितले. शिवराज्य सफाई कर्मचारी सेना, उपेक्षित दलित सामाजिक परिषद, वाल्मीकी समाजातर्फे यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिरात ३ जानेवारी रोजी मराठवाडास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झाले. त्यात त्यांनी हे आश्वासन दिले.

मंचावर राज्य सफाई कर्मचारी आयोग, राष्ट्रीय अध्यक्ष उपेक्षित दलित सामाजिक परिषदचे मुकेश सारवान, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार अंबादास दानवे, शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे मराठवाडा सचिव संजू रिडलॉन, मनीषा गोडबोले माजी नगरसेवक हुशारसिंग चौहान, सुभाष कागडा, रामकुमार रिडलॉन, सनी लाहोट, बलराम टाक, सतीश लगडा, रामपाल सौदे यांची उपस्थिती होती.

देसाई म्हणाले की, शिवसेना कधीही जाती-पातीचा विचार करत नाही. तळागाळातील समाजालासुद्धा प्रगतीची संधी देते. वाल्मीकी समाजाच्या खूप अडचणी आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. शिवसेनेचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, गांधीनगर वसाहत शिवसेनेच्या पाठीशी आहे. शासनानेही येथील समाजाची काळजी घ्यावी.

माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सांगितले की, सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल देण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. सारवान यांनी महाराष्ट्रातील सफाई कर्मचारी शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगितले. महात्मा फुले महामंडळ व इतर महामंडळावर वाल्मीकी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे. वाल्मीकी समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, एमआयडीसीतील भूखंडात वाल्मीकी समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे. मनपातील निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदाराला लाड - पागे समितीच्या शिफारशीनुसार ३० दिवसांत सेवेत घेण्याच्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, वराहपालनासाठी शहराबाहेर जागा द्यावी आदी मागण्या सरकारकडे करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...