आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश चतुर्थी:उत्तर प्रदेशातून अष्टधातुची मूर्ती हिंगोलीत दाखल; शिवसेना गणेश मंडळाचा उपक्रम

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरात गणेश मूर्ती स्थापनेची धूम सुरू असून शिवसेना गणेश मंडळाकडून अष्टधातुची मूर्ती उत्तरप्रदेशातून विमानाने मागवण्यात आली आहे. शुक्रवारी ता. 10 आज पहाटे चार वाजता ही मूर्ती हिंगोलीत दाखल झाली. हिंगोली येथील शिवसेना सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने मागील काही वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यानंतर मागील वर्षापासून पंचधातूच्या मूर्तीची स्थापना करून विसर्जनाच्यावेळी सदर मूर्ती जिल्ह्यातील देवस्थानला दिली जाते.

हिंगोली येथील शगुन भांडी भांडारचे मालक राहुल कानडे हे मूर्ती उपलब्ध करून देतात. दरम्यान यावर्षी अष्टधातूची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय मंडळाचे पदाधिकारी तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष नगरसेवक अशोक नाईक यांच्यासह मंडळाने घेतला. त्यानुसार त्यांनी राहुल कानडे यांच्याशी संपर्क साधून मूर्तीसाठी विचारणा केली. त्यावरून उत्तर प्रदेशातील अलिगड येथून सदरील गणेश मूर्ती मागवण्यात आली. उत्तर प्रदेशातून दिल्ली व त्यानंतर दिल्ली येथून नागपूरचा विमानप्रवास करीत गणपती बाप्पाची मूर्ती नागपूरला आली.

नागपूर येथून वाहनाने ही मूर्ती आज पहाटे चार वाजता हिंगोलीत आणण्यात आली आहे. हिंगोली शहरात आल्यानंतर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्तीचे विधिवत पूजन केले. सुमारे चार फूट उंचीची असलेली अष्टधातूची मूर्ती 85 किलो वजनाची आहे. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून हिंगोली शहरात मूर्ती स्थापना केली आहे. दहा दिवसांनी मूर्तीचे प्रतिकात्मक विसर्जन करून ही मूर्ती हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील संस्थांनला दिली जाणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक अशोक नाईक यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...