आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद ते आष्टी बससेवा:जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन; ऑनलाइन आरक्षणाची होणार सोय, प्रवाशांना दिलासा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्यवर्ती बसस्थानाकातून मंगळवारी औरंगाबाद आष्टी बससेवा सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते 44 आसन क्षमतेच्या बससेवेचे उद्घघाटन करण्यात आले. नवीन बससेवेमुळे प्रवाशांची सोय झाली आहे.

असे आहे वेळापत्रक

कोरोना महामारी आणि एसटी कर्मचारी संप दीर्घ काळ चालला. या काळात बससेवा ठप्प झाली होती. मात्र, आता सर्व मार्गांवर बससेवा पूर्ववत झाली आहे. तसेच नवीन शहरातून बस सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यानुसार औरंगाबाद आष्टी बससेवा सुरू करण्यात आली आहे. आष्टी ते औरंगाबाद बस सकाळी ७ वाजता आष्टी बसस्थानकातून सुटेल. कडा, पाथर्डी, शेवगाव, नेवासा फाटा मार्गे औरंगाबादला १०.४५ वाजता पोहोचेल. तर दुपारी १.३० वाजता औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून आष्टीसाठी बस सुटेल व सायंकाळी ५.१५ वाजता पोहोचेल. प्रौढांसाठी २५५ रुपये तर मुलांकरीता १३० रुपये बसचे तिकिट दर आहे.

असे करा आरक्षण

रा.प.महामंडळाने http//public.msrtcors.com आणि https://msrtc.mahaonline.gov.in या दोन वेबसाइटवर प्रवाशांसाठी कुठुन व कुठेही जाण्यासाठी ऑनलाइन सिट आरक्षण सेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच मोबाइल अॅपवरही आरक्षणाची व्यवस्था केली आहे. नवीन बससेवेचे उद्धघाटन झाल्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते आगारच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विभाग नियंत्रक अरूण सिया, अमोल आहिरे, आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.