आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एशियन एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप:औरंगाबादच्या 21 युवा खेळाडूंची भारतीय संघात निवड, थायलंडला होणार रवाना

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

3 ते 5 सप्टेंबर 2022 दरम्यान सातव्या एशियन एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारताचा संघ 31 ऑगस्ट रोजी स्पर्धेसाठी मुंबईहून रवाना होणार आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रथमच औरंगाबादच्या 21 युवा खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत वरिष्ठ गट, कनिष्ठ आणि बालगट गट या तीन प्रकारात खेळाडू सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय संघात स्थान

खेळाडूंबरोबर अधिकारी, पंच व प्रशिक्षक म्हणून देखील औरंगाबादच्या तिघांची भारतीय जिम्नँस्टिक महासंघाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. चंदिगड येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी जुलैमध्ये झालेल्या भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) उपसंचालक नितीन जैस्वाल, औरंगाबाद विभागाचे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष अॅड. संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ.रणजीत पवार यांनी अभिनंदन करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

जोशी, महाजन यांची नियुक्ती

या स्पर्धेसाठी डॉ. मकरंद जोशी यांची तांत्रिक समिती तज्ञ म्हणून निवड झाली आहे. तसेच पंच म्हणून अमेय जोशी यांची निवड करण्यात आली आणि संघासोबत प्रशिक्षक म्हणून ईशा महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवड झालेले

खेळाडू :

वरिष्ठ गट :-

धैर्यशील देशमुख, संदेश चिंतलवाड, उदय मधेकर, राम अर्जुन, प्रेम बनकर (ग्रुप व एरोडान्स), विजय इंगळे, सिल्वी शहा, सायली वझरकर, साक्षी डोंगरे (एरोडान्स).

कनिष्ठ गट :-

आर्य शहा (एम आय, ग्रुप), स्मित शहा, देवेश कातनेश्वर कर, अद्वैत वझे (मिश्र तिहेरी, ग्रुप), राधा सोनी (मिश्र दुहेरी, ग्रुप).

बालगट :-

अनिकेत चौधरी (एमआय, मिश्र दुहेरी), गौरी ब्राह्मणे (मिश्र दुहेरी), विश्वेश पाठक (मिश्र तिहेरी, ग्रुप), अनुराग देशमुख, रिया नाफडे (मिश्र दुहेरी, ग्रुप), गीत भालसिंग (ग्रुप), सान्वी सौंदळे.

बातम्या आणखी आहेत...