आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएएसआर मसिआ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत किर्दक चार्जस व सिमेन्स स्मॅशर्स संघातील सामना टाय झाला. दुसऱ्या लढतीत इंड्युरन्सने धनंजय संघावर 10 गडी राखून मात केली. या लढतीत अमोल बेंढरे व वसिम शेख सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.
एमजीएम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना धनंजयचा डाव 14.1 षटकांत 54 धावांवर संपुष्टात आला. यात सलामीवीर अर्जुन गवळी अवघ्या एका धावेवर परतला. दुसरा सलामीवीर कैलास कुटेने 30 चेंडूंत 16 धावा केल्या. किशोर कांबळेने 10 धावा जोडल्या. इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इंड्युरन्सकडून आशिष वरदेने 7 धावा देत 3 गडी बाद केले. अमोल बेंढरे, अरुण अधाने व दत्ता तोडकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
प्रत्युत्तरात, इंड्युरन्स संघाने 5.1 षटकांत एकही गडी न गमावता विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर गजेंद्र भोसलेने 14 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 24 धावांची विजयी खेळी केली. दुसरा सलामीवीर अमोल बेंढरेने 17 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार खेचत नाबाद 30 धावांची कॅप्टन इनिंग खेळली. धनंजयकडून रमेश राठोडने सर्वाधिक 21 धावा दिल्या.
अखेरच्या चेंडूवर सामना बरोबरी
दुसऱ्या लढतीत किर्दक चार्जस व सिमेन्स स्मॅशर्स यांच्यातील सामना टाय झाला. प्रथम खेळताना किर्दकचा डाव 14.5 षटकांत 95 धावांवर संपुष्टात आला. यात जावेद देशमुखने 23 चेंडूंत 2 चौकारासह 23 धावा केल्या. संजय बनकरने 21 चेंडूंत 28 धावा काढल्या. इतर फलंदाज आल्यापावली परतले. सिमेन्सकडून वसिम शेख व परागराज गाडेने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात, सिमेन्सने 15 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूंवर 5 बाद 95 धावा पूर्ण करत सामना बरोबरीत राखला. यात दुर्गेश देशपांडेने 16, सी.पी. अनुपने सर्वाधिक 31 व वसिम खानने नाबाद 30 धावांची खेळी केली. पवन सरोवरने 2 बळी घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.