आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा व सत्र न्‍यायालयाचा आदेश:सहायक फौजदार ठाकूरला 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजारांची लाच मागून दहा हजार रुपये घेणारा सिटी चौक पोलिस ठाण्‍याचा सहायक फौजदार अमरसिंह भजनसिंह ठाकूर (५०, रा. अमोदी हिल, ई ८, न्यू पहाडसिंगपुरा) याला १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.एम. आगरकर यांनी दिले.ठाकूर याने तक्रारदाराकडून गुन्ह्यात यापूर्वी दोनदा पैसे घेतले आहेत, ते पैसे ठाकूरकडून हस्तगत करायचे आहेत. गुन्‍ह्यातील कागदपत्रे आणि मोबाइल, कॉल डिटेल्स हस्तगत करायचे आहेत. साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत, याचादेखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी लोकाभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केली होती. आरोपी ठाकूरतर्फे अॅड. प्रकाश उंटवाल यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...