आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. के. मोरे यांना पोलिस महासंचालकांचा सर्वोत्कृष्ठ अपराधसिध्दी पुरस्कार, शर्टच्या खिशावरून खूनचा उलगडा

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. के. मोरे यांना पोलिस महासंचालकांचा ‘सर्वोत्कृष्ठ अपराधसिध्दी’ हा पुरस्कार जाहिर झाला आहे. सातारा जिल्हयातील भुईज पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत असतांना अनोळखी मृतदेहाच्या खिशावरून खूनाचा उलगडा करून आरोपीला जन्मठेपीची शिक्षा होण्यासाठी त्यांनी तपासामध्ये महत्वपूर्ण भुमीका बजावली आहे.

हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे हे सन २०१८ मध्ये सातारा जिल्ह्यातील भुईज पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पुणे –बैेंगलुरु या महामार्गावर जुलै २०१८ मध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मयत व्यक्तीच्या अंगावर केवळ एक शर्ट होता. शर्टच्या खिशावर ‘पेटल्स’ असे नमुद होते. त्यावरून मोरे यांच्या पथकाने ठाणे ते पुणे या मार्गावर येणाऱ्या गावांमध्ये या नावाचे दुकान आहे काय याची माहिती घेतली. सात दिवसानंतर पुणे येथील लक्ष्मीरोड भागात दुकान असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून मोरे यांच्या पथकाने दुकानदाराकडे जाऊन मयताचे छायाचित्र दाखविले. त्यावरून ती व्यक्ती रुफू काम करणारी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या पथकाने त्याच्या पुणे येथील इंद्रायणीनगरात जाऊन शोध घेतला अन मयत व्यक्तीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. अनैतिक संबंधातून हा खूुन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रवींद्र बद्रीनाथ राठोड यास अटक केली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनात मयत व्यक्तीची एक चप्पलही आढळून आली. पोलिसांनी पुरावे गाेळा करतांना टोल नाक्यावरील फुटेज तसेच पेट्रोलपंपावरील माहिती गोळा करून शास्त्रोक्त पध्दतीने तपास केली. यामध्ये रवींद्र राठोड यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दरम्यान, शास्त्रोक्त पध्दतीने झालेल्या या तपासामध्ये केवळ शर्टच्या खिशावर असलेल्या पट्टीवरून मयताची ओळख पटवून खूनाचा उलगडा झाला अन आरोपीला जन्मठेपही झाली. त्यांच्या या कामगिरी बद्दल मोरे यांना नुकतेच पोलिस महासंचालकाचा सर्वोत्कृष्ठ अपराधसिध्दी पुरस्कार जाहिर झाला आहे. पोलिस महासंचालकांचे प्रशस्तीपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार त्यांना सातारा पोलिस अधिक्षक कार्यालयामार्फत नुकताच पाठविण्यात आला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser